देहू, पुणे : दिवाळीचा आनंद सर्वांनी मिळून साजरा करण्याचा सुंदर संदेश देत सामाजिक कल्याण एवं मानव संरक्षण संघ, पुणे यांच्या वतीने देहू येथील वात्सल्य मतिमंद मुलांची निवासी शाळा येथे विशेष फराळ वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
संघाचे पुणे जिल्हाध्यक्ष श्री.अमित कोकणे यांच्या पुढाकाराने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत सांगितले की,
“दिवाळी हा केवळ सण नसून एकत्र येऊन आनंद वाटण्याचा दिवस आहे. समाजातील प्रत्येक घटक या प्रकाशोत्सवात सहभागी झाला पाहिजे. मतिमंद मुलांमधील निरागसतेत खऱ्या आनंदाचा प्रकाश दडलेला आहे.”
या प्रसंगी संघाच्या पदाधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांना दिवाळी फराळाचे वाटप करून त्यांना दिवाळी लायटिंग आणि आकाश कंदील पण देण्यात आले.
वात्सल्य शाळेच्या प्रशासनाने या उपक्रमाबद्दल संघाचे आभार मानले आणि मुलांच्या चेहऱ्यावर दिसलेले समाधान पाहून सर्वांचे मन भरून आले.
सामाजिक कल्याण एवं मानव संरक्षण संघ पुणे यांच्या या उपक्रमामुळे समाजात प्रेम, आपुलकी आणि सेवाभावाचा सुंदर संदेश पसरला आहे.
सदर कार्यक्रम प्रसंगी सामाजिक कल्याण एवं मानव संरक्षण संघ पुणे जिल्हा अध्यक्ष अमित कोकणे व किशोर थोरात, पुणे जिल्हा उपाध्यक्ष भगवान वायकर,पुणे शहर जनरल सेक्रेटरी रवींद्र आळणे,पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष महेंद्र शेळके ,पिंपरी चिंचवड शहर सचिव विनायक जगताप,सदस्य आशिष कदम, रिनाताई शिंदे आणि निलेश निर्मल उपस्थित होते.
पुणे जिल्हा अध्यक्ष किशोर थोरात यांनी सांगितले की लोक दीप उत्सव साजरे करतात त्यापेक्षा निराधार,मतिमंद मुलांच्या जीवनात प्रकाश आणण्याचे काम केले तर त्यापेक्षा मोठी दिवाळी दुसरी कोणतीच नसणार.
निराधारांना एक हात मदतीचा म्हणून या वर्षीच्या दिवाळी ही मतिमंद मुलांबरोबर साजरी करून एक सामाजिक बांधिलकी जपली असल्याचेही त्यांनी सांगितले.
सामाजिक कल्याण एवं मानव संरक्षण संघ ही संस्था प्रामुख्याने मानवाधिकार साठी काम करत असताना समाजातील विविध घटकांबरोबर सामाजिक उपक्रम राबवत असते.काही दिवसांपूर्वीच सामाजिक कल्याण एवं मानव संरक्षण संघ पुणे व इतर सामाजिक संस्था यांनी मराठवाड्यातील पूरग्रस्त भागात म्हणजेच बीड जिल्ह्यातील आष्टी तालुका मधील सांगवी पाटण या गावातील तीन शाळेत शैक्षणिक किट वाटले होते तर मागील आठवड्यात अहिल्यालानगर जिल्ह्यातील अकोले तालुका येथील पिंपळदरी गावात व आसपास आदिवासी भागातील सात शाळेतील निराधार मुलांना फराळ वाटप केली व त्यांच्या चेहऱ्यावरील एक अनोखा आनंद मिळविला.
त्याचबरोबर पोलिसांच्या बरोबर सामाजिक उपक्रम राबविणे,कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांचा सन्मान करणे, निराधारांना मदत करणे,रक्तदान शिबिर घेणे असे अनेक उपक्रम हे राबविले जातात.