शुक्रवार दिनांक ०३/१०/२०२५ रोजी चाकण औद्योगिक वसाहती मधील Track components.Ltd. व स्वाभिमानी श्रमिक कामगार संघटना यांच्यामध्ये झालेल्या चौथ्या वेतनवाढ करारावरती संघटनेचे प्रमुख सल्लागार आमदार महेश लांडगे, रोहिदास गाडे, व अध्यक्ष, कामगार नेते जीवन येळवंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत सह्यांचा कार्यक्रम संपन्न झाला.
करारामध्ये झालेले ठळक मुद्दे खलील प्रमाणे
०१) एकूण पगारवाढ :- १४,१००/- ( चौदा हजार शंभर रुपये)
पगाराचा रेशो:- पहिल्या वर्षी ८०% दुसऱ्या वर्षी १०% तिसऱ्या वर्षी १०% मिळणार.
०२) कराराचा कालावधी ०१/०४/२०२४ ते ३१/०३/२०२७ या तीन वर्षांचा राहील.
०३) मेडिक्लेम पॉलीसी १५००००/- रुपये (एक लाख पन्नास हजार रुपये )संपूर्ण खर्च कंपनी करणार, व जादाची ३०००००/- रुपयांची बफर पॉलीसी, या पॉलिसी मध्ये स्वतः, पत्नी, मुले यांचा समावेश करण्यात आला आहे.
०४) मृत्यू साहाय्य योजना
अ) मृत्यू झाल्यास सर्व कामगारांचा आणि सर्व स्टाफचा एक दिवसांचा पगार व ७०००००/- रुपये (सात लाख रुपये फक्त) कंपनीकडून कायदेशीर वारसास मिळणार.
ब) एखाद्या कामगाराचा अपघात होऊन अपंगत्व आल्यास युनियन सोबत चर्चा करून त्यास मदतनिधी व योग्य त्या ठिकाणी कामावर ठेवण्यात येईल.
०५) ग्रुप एक्सीडेंट पॉलिसी:- ५०००००/- लाख रुपये रक्कम कंपनीकडून वारसदारास देण्यात येईल.
०६):- जर एखाद्या कामगाराचा कंपनीत कामावर असताना अपघात झाल्यास त्यामुळे त्याचे काही काळा नंतर उद्धवणार्या आजाराचा खर्च पूर्णपणे कंपनी करनार.
०७) सूटया :-
A) PL - १५
B) SL - ०८
C) CL - ०८
D) PH - १०
E) मतदानाची सुट्टी:- सरकारी आदेशानुसार राहील,
०८) दिवाळी बोनस:- १५२२८/- रुपये रक्कम बोनस म्हणून देण्यात येईल, व १७००/- रुपये गिफ्ट म्हणून देण्यात येईल,
०९) मासिक हजेरी बक्षीस:- ज्या कामगाराचे प्रत्यक्ष कामाचे पूर्ण दिवस भरतील त्या कामगारास मासिक हजेरी बक्षीस म्हणून १०००/- (एक हजार) रुपये देण्याचे मान्य व त्यामध्ये दोन शॉर्ट लिव्ह ग्राह्य धरण्यात येतील कंपनीमध्ये अपघात झाल्यास तो कामगार या योजनेस पात्र राहील
१०) कायमस्वरूपी कामगार :-
१० कामगारांना ०३ टप्प्यामध्ये कायम करून
(Permanent letor) देण्यात येईल, हे मान्य केले आहे.
११) सेवा बक्षीस:-
प्रत्येक कामगारस सेवा बक्षीस दिले जाईल
१) १० वर्ष सेवा पूर्ण झालेल्या कामगारांना २००००/- रुपये (वीस हजार रुपये)
२) १५ वर्ष सेवा पूर्ण झालेल्या कामगारांना २५०००/- रुपये (पंचवीस हजार रुपये).
याप्रमाणे सेवा बक्षीस दिले जाईल.
१२) वैयक्तिक कर्ज सुविधा:- प्रत्येक कामगारास ५००००/- (पन्नास हजार) रुपये देण्याचे मान्य केले आहे.
१३) गुणवंत कामगार पुरस्कार:- प्रत्येक महिन्याला २ गुणवंत कामगारांची निवड करून त्यांना १०००/- रुपये एवढी रक्कम बक्षिस म्हणून देण्याचे मान्य.
१४) प्रत्येक कामगाराला प्रत्येकी १८ महिन्याचा फरक देण्यात येणार आहे.
करारावरती संघटनेच्या वतीने प्रमुख सल्लागार भोसरी विधानसभेचे कार्यसम्राट आमदार महेश लांडगे, प्रमुख सल्लागार रोहिदास गाड़े , संघटनेचे अध्यक्ष जीवन येळवंडे , सरचिटणीस कृष्णा रोहोकले, सचिव - रघुनाथ मोरे , खजिनदार अमृत चौधरी, भट्टू पाटील महादेव येळवंडे, प्रशांत आप्पा पाडेकर, रविंद्र भालेराव, ग्रुपो अंतोलीन युनिट अध्यक्ष - संजय पाटील, ग्रुप अंतोलीन सचिव- महेंद्र कदम, ट्रॅक यूनिट अध्यक्ष दीपक ब-हाटे, उपाध्यक्ष मिंटू कुमार, सरचिटणीस श्री. प्रविण वाडेकर, सहचिटणीस अनिल कुंभार, खजिनदार सवाई सिंह, व्यवस्थापनाच्या वतीने कंपनीचे CEO श्री. राजेश खन्ना साहेब, प्लांट हेड. श्री.गिरीश भेंडगावे साहेब, एच आर मॅनेजर श्री. अविनाश चोरमाले साहेब, श्री जयदीप काटकर , यांनी सह्या केल्या.
संघटनेच्या वतीने प्रमुख सल्लागार भोसरी विधानसभेचे कार्यसम्राट आमदार पै. श्री. महेशदादा लांडगे, सरचिटणीस श्री. कृष्णा रोहोकले, आणि व्यवस्थापनाच्या वतीने कंपनीचे CEO श्री. राजेश खन्ना साहेब, यांनी उपस्थित कामगार बंधू व व्यवस्थापन यांना मोलाचे मार्गदर्शन केले, प्रास्ताविक एच. आर हेड श्री अविनाश चोरमले साहेब यांनी केले, तसेच सूत्रसंचालन पुजाताई थिगळे यांनी केले, व खजिनदार श्री. अमृत चौधरी यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रमाचा समारोप केला
कामगारानी पेढे वाटून फटाक्याची अतिषबाजी करुण आनंद व्येक्त केला.
Track Components Ltd. आणि स्वाभिमानी श्रमिक कामगार संघटना यांच्यात झालेल्या चौथा वेतनवाढीचा करार झाला आहे. हा करार चाकण औद्योगिक वसाहतीमध्ये झाला आहे आणि त्याला "चाकण औद्योगिक क्षेत्रातील सर्वाधिक वेतनवाढ करार" असे म्हटले आहे.
वेतनवाढ कराराचे मुख्य तपशील (Track Components Ltd. आणि स्वाभिमानी श्रमिक कामगार संघटना)
हा करार शुक्रवार, दिनांक ०३/१०/२०२५ रोजी झाला.
१. वेतनवाढ आणि कालावधी
मुद्दा तपशील
एकूण पगारवाढ रु. १४,१००/- (चौदा हजार शंभर रुपये)
पगाराचा रेशो पहिल्या वर्षी ८०%, दुसऱ्या वर्षी १०%, तिसऱ्या वर्षी १०%
कराराचा कालावधी ०१/०४/२०२४ ते ३१/०३/२०२७ (तीन वर्षांसाठी)
फरकाची रक्कम प्रत्येक कामगाराला १८ महिन्यांचा फरक देण्यात येणार आहे.
२. आरोग्य आणि विमा सुविधा
सुविधा तपशील
मेडीक्लेम पॉलिसी रु. १,५०,०००/- चा खर्च कंपनी करणार. रु. ३,००,०००/- ची बफर पॉलिसी जादा मिळणार. (स्वतः, पत्नी, मुले यांचा समावेश)
ग्रुप ॲक्सिडेंट पॉलिसी रु. ५,००,०००/- वारसदारास देण्यात येईल.
अपघातानंतरचा खर्च कंपनीत कामावर असताना अपघात झाल्यास, त्यानंतर उद्भवणाऱ्या आजाराचा खर्च पूर्णपणे कंपनी करेल.
३. मृत्यू साहाय्य योजना
मृत्यू झाल्यास: सर्व कामगारांचा आणि स्टाफचा एक दिवसाचा पगार + कंपनीकडून वारसाला रु. ७,००,०००/- (सात लाख रुपये).
अपंगत्व आल्यास: युनियन सोबत चर्चा करून मदतनिधी व योग्य त्या ठिकाणी कामावर ठेवण्यात येईल.
४. सुट्ट्या (Holidays)
प्रकार संख्या
PL (Previlege Leave) १५
SL (Sick Leave) ०८
CL (Casual Leave) ०८
PH (Public Holiday) १०
मतदानाची सुट्टी सरकारी आदेशानुसार.
५. अन्य लाभ आणि बक्षिसे
लाभ तपशील
दिवाळी बोनस रु. १५,२२८/- बोनस + रु. १,७००/- भेटवस्तू (गिफ्ट).
मासिक हजेरी बक्षीस पूर्ण दिवस काम करणाऱ्या कामगाराला रु. १,०००/- (दोन शॉर्ट लिव्ह आणि कंपनीत अपघात झालेले कामगार पात्र).
गुणवंत कामगार पुरस्कार प्रत्येक महिन्याला २ कामगारांची निवड करून त्यांना रु. १,०००/- बक्षीस.
वैयक्तिक कर्ज सुविधा प्रत्येक कामगारास रु. ५०,०००/- देण्याचे मान्य.
६. सेवा बक्षीस (Service Award)
सेवेची वर्षं बक्षीसाची रक्कम
१० वर्षं रु. २०,०००/- (वीस हजार रुपये)
१५ वर्षं रु. २५,०००/- (पंचवीस हजार रुपये)
७. कायमस्वरूपी कामगार (Permanent Employees)
१० कामगारांना ०३ टप्प्यांमध्ये कायम करून कायमस्वरूपी पत्र (Permanent letter) देण्यात येईल.
प्रमुख उपस्थिती आणि स्वाक्षरी
करारावर प्रमुख सल्लागार आमदार पै. श्री. महेश लांडगे, पै. श्री. रोहिदास गाडे, आणि अध्यक्ष, कामगार नेते श्री. जीवन येळवंडे यांच्या उपस्थितीत सह्या करण्यात आल्या.
संघटना आणि व्यवस्थापनाच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी आणि प्रतिनिधींनी स्वाक्षऱ्या केल्या.
व्यवस्थापनाच्या वतीने: कंपनीचे CEO श्री. राजेश खन्ना साहेब, प्लांट हेड. श्री. गिरीश भेंडगावे साहेब, एच आर मॅनेजर श्री. अविनाश चोरमाले साहेब, श्री जयदीप काटकर.
संघटनेच्या वतीने: प्रमुख सल्लागार आमदार पै. श्री. महेशदादा लांडगे, अध्यक्ष श्री. जीवन येळवंडे, सरचिटणीस श्री. कृष्णा रोहोकले, आणि इतर पदाधिकारी.
हा करार कामगार आणि कंपनी या दोघांसाठीही महत्त्वाचा असून, कामगारांनी पेढे वाटून आणि आतषबाजी करून आनंद व्यक्त केला.