पुणे : सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय आणि निस्वार्थ कार्य केल्याबद्दल सामाजिक कल्याण एवं मानव संरक्षण संघाचे पुणे जिल्हाध्यक्ष श्री. किशोर अण्णासाहेब थोरात यांना दोन प्रतिष्ठित पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.सदर पुरस्कार हे दिनांक १४ ऑक्टोबर २०२५ रोजी पुणे येथील पंडित जवाहरलाल नेहरू सभागृह,घोले रोड, शिवाजीनगर येथे प्रसिद्ध मराठी अभिनेत्री फाल्गुनी झेंडे, डॉ अविनाश सकुंडे व आनंदी युनिव्हर्स फौंडेशन चे संस्थापक गणेश विटकरी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.
आनंदी युनिव्हर्स फाऊंडेशन, पुणे यांच्या वतीने प्रदान करण्यात आलेला “महाराष्ट्र गौरव पुरस्कार २०२५” आणि इंटरनॅशनल ह्यूमन राईट्स अॅम्बेसेडर्स ऑर्गनायझेशन यांच्या तर्फे देण्यात आलेला “जिनिअस इंडियन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड” हा दुहेरी सन्मान श्री. थोरात यांच्या सातत्यपूर्ण सामाजिक कार्याचा गौरव आहे.
श्री. थोरात यांनी निराधार, गरीब, शालेय विद्यार्थी, शेतकरी आणि समाजातील वंचित घटकांसाठी अनेक उपक्रम राबवले आहेत. दुष्काळग्रस्तांसाठी मदतीचे आवाहन, निराधार मुलांना शैक्षणिक साहित्य व फराळ किटचे वाटप, रक्तदान शिबिरे, महिलांच्या सक्षमीकरणासाठी प्रशिक्षण, तसेच समाजजागृती कार्यक्रम हे त्यांच्या कार्याचे ठळक पैलू आहेत.
या दुहेरी पुरस्कारामुळे सामाजिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या सर्व स्वयंसेवकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. श्री. थोरात यांनी या सन्मानाबद्दल समाधान व्यक्त करत सांगितले की, “हा सन्मान माझ्या संघातील प्रत्येक कार्यकर्त्याचा आहे. समाजासाठी काम करण्याची प्रेरणा या पुरस्कारांमुळे अधिक दृढ झाली आहे.”
किशोर अण्णासाहेब थोरात यांचे सामाजिक कार्य
किशोर अण्णासाहेब थोरात हे नाव आज सामाजिक क्षेत्रात निस्वार्थ सेवा, नेतृत्व आणि संवेदनशीलतेचे प्रतीक म्हणून ओळखले जाते.
ते “सामाजिक कल्याण एवं मानव संरक्षण संघ, पुणे” या संस्थेचे पुणे जिल्हाध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत आणि अनेक वर्षांपासून समाजातील वंचित, निराधार व दुर्बल घटकांसाठी सातत्याने विविध उपक्रम राबवत आहेत.
प्रमुख सामाजिक उपक्रम
# गरीब आणि निराधार विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक मदत
किशोर थोरात यांनी ग्रामीण व शहरी भागातील अनेक निराधार विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य, शालेय गणवेश, शाळा किट आणि पुस्तके वाटप केले आहेत.त्यांच्या “एक हात मदतीचा” या उपक्रमातून अनेक विद्यार्थ्यांचे शिक्षण चालू राहिले आहे.
# दिवाळी फराळ, कपडे व अन्नधान्य वाटप
दरवर्षी दिवाळीच्या पार्श्वभूमीवर ते आश्रमशाळांतील मुलांना फराळ किट वाटप करतात.निराधार,अनाथ मुलांना आनंदाचे क्षण मिळावेत म्हणून त्यांच्या संघामार्फत विविध अनाथाश्रमांमध्ये मिठाई, कपडे, अन्नधान्य आणि शैक्षणिक साहित्य दिले जाते.
# दुष्काळग्रस्त आणि शेतकऱ्यांसाठी मदत मोहीम
मराठवाडा व विदर्भातील ओला दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी मदतीचे आवाहन करून त्यांनी शहरवासीयांना ग्रामीण भागाशी जोडले.
# रक्तदान व आरोग्य जनजागृती
थोरात यांनी रक्तदान शिबिरे आयोजित करून तातडीच्या रक्ताच्या गरजेतील रुग्णांना मदत केली आहे. त्यांच्या माध्यमातून “एक जीव वाचवणे हीच खरी सेवा” या विचाराची रुजवात झाली.तसेच त्यांनी नैसर्गिक आरोग्य आणि नाडी परीक्षण याविषयी जनजागृती केली.
# महिला सक्षमीकरण व सामाजिक जागरूकता
त्यांच्या संघामार्फत महिलांसाठी शिवणकाम, योगा प्रशिक्षण, आत्मरक्षा आणि व्यवसाय प्रशिक्षण शिबिरे घेतली जातात.महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवणे हे त्यांचे प्रमुख ध्येय आहे.
# पर्यावरण संवर्धन व वृक्षारोपण
किशोर थोरात यांनी “एक झाड स्वतःसाठी” अभियानांतर्गत अनेक वृक्ष लावले आहेत.
# पोलीस व नागरिक एकजूट उपक्रम
“पोलीस मित्र संघटना” बरोबर काम करून त्यांनी नागरिक आणि पोलीस यांच्यात संवाद आणि सहकार्याचे पूल उभे केले. क्रिकेट लीग, योगा शिबिरे आणि जनजागृती मोहिमा यांद्वारे समाजातील तरुणांमध्ये शिस्त, क्रीडा आणि सेवा भावना जागृत केली.
कोण आहेत किशोर थोरात?
सातत्याने सामाजिक क्षेत्रात आपला ठसा उमठविणारे किशोर आण्णासाहेब थोरात हे अनेक सामाजिक संस्थांबरोबर काम करत असतात.
सामाजिक कल्याण एवं मानव संरक्षण संघ चे ते पुणे जिल्हा अध्यक्ष आहेत, तर मानवी हक्क जण जागृती बरोबरच पोलीस प्रशासन आणि जनता या मधील दरी दूर करण्यासाठी ते नेहमीच प्रयत्नशील असतात.
श्री समर्थ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे ते संस्थापक अध्यक्ष असून मुलांच्या शिक्षणावर ते काम करतात, तसे आधार शैक्षणिक संस्था पुणे चे ते सचिव असून ग्रामीण भागातील गरीब मुलांच्या शिक्षणाला हातभार लावतात.
अनंतकोटी श्री स्वामी समर्थ सेवामार्ग ट्रस्ट बरोबर ते लोकांच्या समस्या निवारण चे ते काम करतात.
मागील आठवड्यातच त्यांनी सामाजिक कल्याण एवं मानव संरक्षण संघ च्या वतीने इतर संस्थांना बरोबर घेऊन बीड जिल्ह्यातील पुरग्रस्तांच्या मुलांना शैक्षणिक किट देऊन एक हात मदतीचा उपक्रम राबविला तर अकोले तालुक्यातील पिंपळदरी येथील सात शाळेतील आदिवासी मुलांना दिवाळी फराळ वाटप करून एक सामाजिक बांधिलकी दाखवली.
निराधारांच्या व मतिमंद मुलांच्या बरोबर दिवाळी साजरी करणार असून आता पुढील उपक्रम तोच असेल असे त्यांनी सांगितले.
वरील पुरस्कार मिळाल्याने वरील सर्व संस्थांच्या पदाधिकारी व सदस्यांकडुन किशोर थोरात यांचे भरभरून कौतुक केले जात आहे तर सामाजिक कल्याण एवं मानव संरक्षण संघ चे राष्ट्रीय अध्यक्ष राजेशजी कुंभारे, राष्ट्रीय उपाध्यक्ष तेजसजी परमार आणि पश्चिम भारत अध्यक्ष अमोल माने यांनी अभिनंदन केले.
अनंतकोटी श्री स्वामी संमर्थ सेवामार्ग ट्रस्ट चे सर्वेसर्वा संजय तळोले व अध्यक्ष दिगंबर थोरात यांनीही किशोर थोरात यांचे अभिनंदन व कौतुक केले.
किशोर थोरात यांना सामाजिक कार्यासाठी या अगोदरही ३० पेक्षा जास्त पुरस्कार हे विविध सामाजिक संस्थांच्या मार्फत मिळलेले आहेत तर परिसरातून त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.