मराठवाडा मध्ये यावर्षी ओल्या दुष्काळामुळे शेतकऱ्यांवर व त्यांच्या कुटुंबीयांवर मोठे संकट आले आहे. याचा थेट परिणाम ग्रामीण भागातील शालेय विद्यार्थ्यांवरही होत आहे. अनेक मुलांकडे शाळेत जाण्यासाठी लागणारी पुस्तके, वह्या, पेन, बॅग, युनिफॉर्म यांसारखी शैक्षणिक साधने नाहीत.
या परिस्थितीची जाणीव ठेवून सामाजिक कल्याण एवं मानव संरक्षण संघ ,आधार शैक्षणिक संस्था पुणे, श्री समर्थ शैक्षणिक व सामाजिक संस्था,पुणे आणि सदानंद एज्युकेशन संस्था,पुणे तर्फे *"एक हात मदतीचा"* या उपक्रमांतर्गत मराठवाड्यातील विद्यार्थ्यांना शालेय किट (शाळेच्या वह्या, पेन, पेन्सिल,कम्पास बॉक्स इ.) देण्याचे ठरविण्यात आले आहे.
आपण दिलेला प्रत्येक छोटासा हात एखाद्या मुलाच्या शिक्षणाला बळ देईल. शिक्षण हा त्यांच्या भविष्यासाठीचा प्रकाश आहे, आणि हा प्रकाश अंधारात हरवू नये हीच आमची भूमिका आहे.
म्हणूनच आपण सर्व बांधवांना या उपक्रमात सामील होऊन शालेय किटसाठी मदत करण्याचे आवाहन करीत आहोत.
प्रत्येकाने एक किट म्हणजेच एक मुलाची जबाबदारी घेतली तर अति उत्तम,आपल्याला 250 किट ची गरज आहे.
एक किट ची किंमत साधारण 200 रु असेल
मदत कुठे करणार
1. जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा
2. सुदर्शन माध्यमिक विद्यालय
गावाचे नाव - सांगवी पाटण
ता.आष्टी,जि. बीड.
शैक्षणिक किट
1. Classmate A5 100 pages Notebook (Qty 6)
2. A4 Youva Drawing book (Qty 1)
3. Pouch (Qty 1)
4.Pen Reynolds Champ Pen (Qty 2)
5. Eraser (Qty 1)
6. Sharpner (Qty 1)
7. Natraj Pencil (Qty 1)
8. Camlin Scale (Qty 1)
9. Wax Crayon Set*:01
आपली मदत = एका विद्यार्थ्याच्या चेहऱ्यावरचा आनंद
Donar List
1. आधार शैक्षणिक संस्था : 100 किट
2. श्री समर्थ शैक्षणिक व सामाजिक संस्था : 25 किट
3. सदानंद एज्युकेशन संस्था,मोशी : 50 किट
4. श्री अमित कोकणे : 25 किट
5. श्री विनायक जगताप :14 किट
6. *कु.अथर्व रविंद्र आळणे यांचे स्मरणार्थ* *अथर्व वॉटर टेक् सोल्युशन्स, पुणे* तर्फे : 25 किट
7. राजश्री रावडे मॅडम: 10 किट
8. आकाश जगताप: 10 किट
9. संपती मोहिते मॅडम:10 किट
10. राजेंद्र नंदरगी: 5 किट
सर्व किट देणगीदारांचे धन्यवाद
आपला,
श्री.किशोर आण्णासाहेब थोरात
पुणे जिल्हा अध्यक्ष,
सामाजिक कल्याण एवं मानव संरक्षण संघ