आळंदी देवस्थानतर्फे पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीत २१ लाख रुपये


 

२१ लाख रुपये निधी मुख्यमंत्री यांना सुपूर्द 

आळंदी (अर्जुन मेदनकर) : राज्यात विविध ठिकाणी झालेल्या अतिवृष्टी, मुसळधार पावसामुळे नद्यांच्या लगत असलेल्या भागात शेतीसह नद्यांच्या लगेच राहत असलेल्या नागरिक, रहिवासी ग्रामस्थ यांच्या घरात पाणी घुसल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. राज्यातील पूर परिस्थिती आणि अतिवृष्टी याचा विचार करून श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी आळंदी यांनी मुख्यमंत्री सहायता निधीस २१ लाख रुपये देणगीचा धनादेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कडे सुपूर्द केला. 

  या प्रसंगी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, प्रमुख विश्वस्त योगी निरंजन नाथसाहेब, विश्वस्त भावार्थ देखणे, ऍड राजेंद्र उमाप, चैतन्य महाराज लोंढे कबीरबुवा, पुरुषोत्तम महाराज पाटील आणि माऊली देवस्थानचे मुख्य व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, ही मदत अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी तसेच बाधितांचे पुनर्वसन करण्यास वापरली जाईल. 

  राज्यातील विविध भागात अतिवृष्टीसह मुसळधार पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतीचे तसेच शेतमाल, आणि शेत जमिनी महापुराची पाण्याने वाहून गेल्या आहेत. पिकांचे, शेतीचे तसेच नद्यांच्या लगत असलेल्या शहरातील, गावातील नागरिकांचे मोठ्या प्रमाणात घरांचे नुकसान देखील झालेले आहे. अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले आहे. या आपत्तीतून शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी आळंदी यांनी ३१ लाख रुपयांची देणगी देऊन सामाजिक बांधिलकी जोपासली आहे. इतरही देवस्थान, मठ, मंदिर, धर्मशाळा, संस्था यांनी अशाच पद्धतीची मदत तात्काळ जाहीर करून सामाजिक बांधिलकी आणि मदतीची भावना जोपासावी असे आवाहन करण्यात आले आहे. 

    या महापुराची संकटात अनेकांचे संसार उध्वस्त झाले आहेत. घरातील सर्व वस्तू वाहून गेल्यामुळे अनेकांचे संसार उघड्यावर आले आहेत. अनेकांना घर राहण्या योग्य नसल्याने उघड्यावर रहावे लागत आहे. अनेकांना खाण्याची सोय राहिली नाही. अगदी किराणा माल ही नसल्याने जेवणाचीही गैरसोय असल्याचे समजते आहे. 

   राज्यातील या पूर परिस्थितीचा आढावा घेऊन राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी जोर धरत आहे. राज्य शासनाने मदत आणि पुनर्वसन कार्य तत्काळ हाती घेण्याची मागणी शासनास बाधितांचेसह सामाजिक संस्थांनी देखील केली आहे. 

  श्री गजानन महाराज संस्थान शेगाव यांनी हि एक हात मदतीचा पुढे करीत मुख्यमंत्री सहाय्यता निधीत १ कोटी ११ लाख रुपयांची मदत धनादेशाचे द्वारे दिली आहे. यातून सामाजिक बांधिलकीतून एक हात मदतीचा पुढे केला आहे. अशाच संस्थानचे कार्याचा आदर आणि प्रेरणा घेवून इतर संस्थानी देखील पुढे येण्याची गरज असल्याचे आवाहन करण्यात आले आहे.

थोडे नवीन जरा जुने