पिंपरी चिंचवड - शिवशाही व्यापारी संघ कामगार आघाडीच्या वतीने प्रदेश अध्यक्ष गणेश दादा कलवले यांच्या नेतृत्वाखाली कामगारांची दसरा सवांद बैठक मोठ्या उत्साहात शिवशाही व्यापारी संघ कामगार आघाडी लेबर नाका,भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर प्रवेशद्वार समोर अंकुश चौक निगडी या ठिकाणी पार पडली.
दरम्यान यावेळी शेकडो कामगारांना शिवशाही व्यापारी संघ कामगार आघाडीचे ओळखपत्रक वाटप करण्यात आले. तसेच बांधकाम कामगारांना शासकीय योजनांची माहिती देऊन त्यांना ती आर्थिक स्वरूपात मिळवून देण्यासाठी संकल्प करण्यात आला.
यावेळी शिवशाही व्यापारी संघ संस्थापक अध्यक्ष युवराज दाखले,प्रदेशाध्यक्ष कृष्णा दादा साबळे, शिवशाही व्यापारी संघ कामगार आघाडी प्रदेश अध्यक्ष गणेश दादा कलवले,मार्गदर्शक सा.लो.आण्णा भाऊ साठे जयंती महोत्सव समिती मा अध्यक्ष डी पी खंडाळे,सचिव सुरज आण्णा कांबळे, प्रदेश उपाध्यक्ष मंगेश डोखोरे, जेष्ठ नेते नानासाहेब कांबळे, पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष शिवाजीराव खडसे, लोणावळा शहर अध्यक्ष तुषार सावंत, बापु डंबरे, सामाजिक कार्याकर्त्या वैशाली जाधव, अश्विनी टेमकर यांनी मार्गदर्शन केले.
तसेच शिवशाही व्यापारी संघ युवक आघाडी अध्यक्ष ऋषिकेश वाघमारे यांच्या सह निगडी विभाग अध्यक्ष माणिक माने, सलीम भाई शेख उपाध्यक्ष, शंकर आव्हाड खजिनदार,अजय डोळस सचिव, कुंदन ढगे कार्याध्यक्ष, अन्वर सय्यद सल्लागार, सुरेश भोसले, विशाल मोरे सहसचिव,लहु सोनकांबळे ,तसेच सदस्य किरण कांबळे,आयुब खान, सुनिल कांबळे, प्रेम शिंदे राजेश जाधव संभाजी पवार, अनिल चौधरी, पवन जगताप, राजेंद्र पवार ,राजू मिरेकर, बाबू बनसोडे, सुभाष, सदाशिव ,सुमंत जोगदंड शशिकांत तिडके, भागवत मस्के ,गणीभाई पठाण, नारायण पवार, गजानन गोपकर आदी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.