PCMC : नाना काटे सोशल फाउंडेशन व उत्तर भारतीय नागरिक यांच्या वतीने छटपूजा उत्सव संपन्न

 


पिंपरी चिंचवड - प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी दिनांक २७ व २८ नोव्हेंबर रोजी पिंपळे सौदागर येथील उत्तर भारतीय नागरिकांसाठी नाना काटे सोशल फाउंडेशनच्या वतीने महादेव मंदिराजवळील पवना नदी घाटावर छठ पूजेचे आयोजन करण्यात आले.

या पूर्वी पुणे महापालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून नदी घाटाची स्वच्छता करण्यात आली होती.

उत्तर भारतीय समाजासाठी छठ पूजा ही अत्यंत महत्त्वाची धार्मिक परंपरा असून ही पूजा धरणी माता आणि सूर्य भगवान यांच्या उपासनेसाठी केली जाते. विवाहित महिला आपल्या मनोकामना पूर्ण होण्यासाठी तीन दिवस निरंकार उपवास करून व्रत पाळतात. सूर्यदेवाला सायंकाळी दीपक प्रज्वलित करून तसेच विविध प्रकारची फळे अर्पण करून पूजा केली जाते.

दुसऱ्या दिवशी पहाटे साडेचारच्या सुमारास त्या महिला नदीत उभ्या राहून सूर्योदयाची प्रतीक्षा करतात आणि सूर्यदेवाची उपासना करतात. पुरोहितांच्या मंत्रोच्चारासह नदीत दूध अर्पण करून पूजा संपन्न होते. त्यानंतर प्रसाद आणि फळे वाटप करून एकमेकांविषयी आनंद व आदर व्यक्त केला जातो.

या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते श्री. विठ्ठल (नाना) काटे यांचा उत्तर भारतीय नागरिकांच्या वतीने सन्मान करण्यात आला. यावेळी मा. नगरसेवक विलास पाडाळे, युवा नेते उमेश काटे, सोनिगरा ज्वेलर्सचे प्रो. दिलीप सोनिगरा, जितेंद्र सोनिगरा, तसेच आयोजक ब्रिजेश सिंह, दुर्गेश कुमार सिंह, राकेश गुप्ता, विनयकुमार गुप्ता, विजय चौहान, अमरजीत सिंह, मानसिंह, विजय बहादूर प्रजापती, अजय कुमार गुप्ता, जनार्दन सिंह आणि उत्तर भारतीय नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

थोडे नवीन जरा जुने