मोठी बातमी : गौतमी पाटील हिला अटक होणार? पुणे पोलिसांची नोटीस

Pune Police issues notice to Gautami-Patil-likely-to-be-arrested-in-Pune-accident-case


पुणे : महाराष्ट्रातील प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटीलच्या मालकीच्या कारने पुण्यातील मुंबई-बंगळूरू महामार्गावर भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. या अपघातात रिक्षाचालकासह दोन प्रवासी जखमी झाले असून, रिक्षाचे मोठे नुकसान झाले आहे. अपघातानंतर गौतमी पाटीलच्या चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले असले तरी, जखमी रिक्षाचालकाच्या नातेवाईकांनी गौतमी पाटील अटक करण्याची मागणी केली आहे.

अपघात ३० सप्टेंबर रोजी पहाटे सुमारे ५ वाजता वडगाव बुद्रुक परिसरातील नवले पुलाजवळ घडला. मुंबई-बंगळूरू राष्ट्रीय महामार्गावर एका हॉटेलसमोर उभ्या असलेल्या ऑटो रिक्षाला गौतमी पाटीलच्या कारने (किआ कारेन्स मॉडेल) पाठीमागून जोरदार धडक दिली. ही धडक इतकी प्रचंड होती की रिक्षा काही अंतरापर्यंत ढकलली गेली आणि त्याचे मोठे नुकसान झाले. रिक्षामध्ये चालकासह दोन प्रवासी होते, सर्व गंभीर जखमी झाले. स्थानिक नागरिकांनी तत्काळ मदत करत जखमींना रुग्णालयात दाखल केले. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू असून, प्रकृती स्थिर आहे.

अपघातावेळी गौतमी पाटील कारमध्ये बसलेली नव्हती. तिचा चालक कार चालवत होता, अशी प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे. पोलिसांनी चालकाला ताब्यात घेतले असून, अपघाताचे कारण चालकाचा वेग मर्यादेपेक्षा जास्त असल्याचे सांगितले जाते. घटनास्थळीचे सीसीटीव्ही फुटेज पोलिस तपासत आहेत.

अपघातानंतर चार दिवस उलटले तरी गौतमी पाटील किंवा तिच्या टीमकडून कोणताही संपर्क साधला गेला नाही, असा आरोप जखमी रिक्षाचालकाच्या नातेवाईकांनी केला आहे. ३ ऑक्टोबर रोजी ते सिंहगड रोड पोलीस स्टेशनला धाव घेऊन पोहोचले आणि गौतमी पाटीलची अटक करण्याची मागणी केली. "इतका मोठा अपघात झाल्यानंतरही गौतमी पाटीलची चौकशी झालेली नाही. अपघाताला कारणीभूत असलेली कार पंचनामा होण्यापूर्वीच घटनास्थळावरून टोईंग करून नेण्यात आली. पोलिसांचे सहकार्य मिळत नसल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे.

दरम्यान, या प्रकरणात पुणे पोलिसांनी गौतमी पाटीलला चौकशीसाठी नोटीस जारी केली असल्याची माहिती समोर येत आहे. अपघातातील कार गौतमीच्या नावावर नोंदणीकृत असल्याने तिची जबाब नोंदवला जाईल. चालकावर गुन्हा दाखल असून, तपास अहवालानंतर पुढील कारवाई होईल.

Pune Police issues notice to Gautami-Patil-likely-to-be-arrested-in-Pune-accident-case

थोडे नवीन जरा जुने