मंचर (रफिक शेख) : पुणे जिल्ह्यातील मंचर येथे पेट्रोल पंपावर सशस्त्र दरोडा टाकल्याची घटना घडली आहे. मंचर येथील इंडियन पेट्रोल पंपावर रात्री उशिरा चार सशस्त्र दरोडेखोरांनी दरोडा टाकला. ही संपूर्ण घटना पेट्रोल पंपावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून, ती सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.
मंचर येथील तांबडे मळा येथील इंडियन पेट्रोल पंपावर शुक्रवारी रात्री सुमारे ९:३० च्या सुमारास चार दरोडेखोरांनी हवेत गोळीबार करून लूटमार करून पळ काढला. दरोडेखोरांनी गावठी पिस्तूळीने हवेत गोळीबार करून कर्मचाऱ्यांना दमकावले आणि रोख रक्कम लुटून पळ काढला. दरोडा टाकल्यानंतर दरोडेखोर नारायणगाव बाजूकडे पळाले.
मंचर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, तपास सुरू आहे. पंपावरील सीसीटीव्ही फुटेजनुसार, दरोडेखोर दुचाकींवरून आले होते. त्यापैकी दोघे पंपाच्या आत घुसले होते. दरोडेखोरांच्या हातात गावठी पिस्तूळ होती. दरोडेखोरांची अजून ओळख पटलेली नाही, पण सीसीटीव्ही फुटेजद्वारे त्यांची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे.
Armed robbery at petrol-pump-in-Manchar-looting-by-firing-in-air