- आमदार महेश लांडगे यांच्या उपस्थितीत वेतनवाढ करार
- स्वाभिमानी कामगार संघटनेमुळे कामगारांच्या हक्कांचे संवर्धन
पिंपरी-चिंचवड - चाकण औद्योगिक वसाहातीमधील ट्रॅक कॉम्पोनंट लि. व स्वाभिमानी श्रमिक कामगार संघटना यांच्यात औद्योगिक क्षेत्रातील सर्वात मोठा वेतनवाढ करार झाला. कंपनीच्या कामगारांना 14 हजार 100 रुपयांची पगारवाढ मिळाली आहे. त्यामुळे यंदा कंपनीच्या कामगारांची दिवाळी अधिक गोड होणार आहे.
कंपनी व्यवस्थापन आणि कामगार संघटना यांच्यामध्ये चौथ्या वेतनवाढ करार झाला. यावेळी संघटनेचे प्रमुख सल्लागार आमदार महेश लांडगे, रोहिदास गाडे व अध्यक्ष जीवन येळवंडे उपस्थित होते.
करारावरती संघटनेच्या वतीने सरचिटणीस कृष्णा रोहोकले, सचिव रघुनाथ मोरे, खजिनदार अमृत चौधरी, भट्टू पाटील, महादेव येळवंडे, प्रशांत पाडेकर, रविंद्र भालेराव, ग्रुपो अंतोलीन युनिट अध्यक्ष संजय पाटील, ग्रुप अंतोलीन सचिव महेंद्र कदम, ट्रॅक यूनिट अध्यक्ष दीपक ब-हाटे, उपाध्यक्ष मिंटू कुमार, सरचिटणीस प्रविण वाडेकर, सहचिटणीस अनिल कुंभार, खजिनदार सवाई सिंह, व्यवस्थापनाच्या वतीने कंपनीचे CEO राजेश खन्ना, प्लांट हेड गिरीश भेंडगावे, एचआर मॅनेजर अविनाश चोरमाले, जयदीप काटकर यांनी सह्या केल्या आहेत.
प्रास्ताविक एच. आर हेड अविनाश चोरमले यांनी केले. तसेच, सूत्रसंचालन पुजा थिगळे यांनी केले. खजिनदार अमृत चौधरी यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रमाचा समारोप केला. कामगारानी पेढे वाटून फटाक्याची अतिषबाजी करुण आनंद व्येक्त केला.
वेतनवाढ करारातील प्रमुख मुद्दे…
एकूण पगारवाढ : 14 हजार 100 रुपये. मेडिक्लेम पॉलीसी 150000/- रुपये (एक लाख पन्नास हजार रुपये) संपूर्ण खर्च कंपनी करणा आहे. जादाची 300000 रुपयांची बफर पॉलीसी, या पॉलिसीमध्ये स्वतः पत्नी, मुले यांचा समावेश करण्यात आला आहे. मृत्यू साहाय्य योजना, ग्रुप एक्सीडेंट पॉलिसी, सुट्टया : 41, दिवाळी बोनस : 15 हजार 228 रुपये रक्कम बोनस, मासिक हजेरी बक्षीस, सेवा बक्षीस, वैयक्तिक कर्ज सुविधा, गुणवंत कामगार पुरस्कार, प्रत्येक कामगाराला प्रत्येकी १८ महिन्याचा फरक देण्यात येणार आहे.