श्री स्वामी समर्थ सेवा प्रतिष्ठानच्या वतीने मिठाईवाटप

  


 पिंपरी चिंचवड : शिवतेज नगर, चिंचवड  येथील श्री स्वामी समर्थ सेवा प्रतिष्ठानच्या वतीने दिवाळीच्या निमित्ताने पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आरोग्य विभागातील सफाई कर्मचाऱ्यांना मिठाईची वाटप करण्यात आले. स्वतःचं आरोग्य धोक्यात घालून नागरिकांच्या आरोग्य चांगलं राहावं, यासाठी हे सफाई कर्मचारी दैनंदिन साफसफाई करत असतात. सणासुदीच्या काळात देखील सुट्टी वगैरे न घेता शहर स्वच्छ ठेवण्यासाठी काम करत असतात. अशा सफाई कर्मचाऱ्यांची दिवाळी देखील गोड व्हावी, म्हणून प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षी हा उपक्रम राबवण्यात येतो. 





या उपक्रमाचे आयोजन श्री स्वामी समर्थ सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष माजी नगरसेवक नारायण बहिरवाडे यांनी केले. मिठाईचे वाटप महिला मंडळाचे कार्याध्यक्ष सारिका रिकामे, सेवेकरी प्रमुख क्षमा काळे, देव काका, श्रीनिवास लोढा, अंजली देव, शोभा नलगे, बबन भागडे, जितेंद्र छाबडा यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी आरोग्य विभागाचे सुभाष कांबळे, विजय जाधव तसेच सफाई कर्मचारी उपस्थित होते.









थोडे नवीन जरा जुने