पूरग्रस्तांना डब्ल्यू.एम.ओ. संस्थेकडून मदतीचा हात

 


पिंपरी चिंचवड - डब्ल्यू.एम.ओ. संस्थेकडून माढा तालुक्यातील सुलतानपूर, निमगाव आणि वडशिंगे या गावांतील पूरग्रस्त कुटुंबांना मोठ्या प्रमाणात मदत करण्यात आली.

 या मदत उपक्रमात २५० हून अधिक किराणा किट, २०० हून अधिक साड्या, लहान मुलांसाठी शालेय साहित्य व कपडे, पुरुषांसाठी शर्ट-पॅन्ट, तसेच एक वर्षाखालील बालकांसाठी पाळणे व गाद्या वाटप करण्यात आले.

  यावेळी सलोनी नरवडे, अनिकेत जरे, रवी जाधव, सुभाष पालेकर, चेतन गोळे, विजय साळेकर, स्थानिक ग्रामस्थ, माजी सरपंच अनिल शिंदे, गोरक्ष शिंदे, प्रशांत जाधव उपस्थित होते.

सलोनी नरवडे यांनी सांगितले, पूरग्रस्त नागरिकांच्या दैनंदिन गरजा भागवण्यासाठी ही मदत थोडासा आधार ठरावी, ही आमची मनापासून इच्छा आहे. समाजातील प्रत्येकाने अशा वेळी पुढाकार घेऊन माणुसकी जपावी.

 रवी जाधव यांनी सांगितले, पूरग्रस्त भागातील लोकांनी मोठ्या संकटाचा सामना केला आहे. त्यांच्या चेहऱ्यावर थोडं हसू आणता आलं, हीच आमच्यासाठी मोठी समाधानाची बाब आहे. संस्थेचे कार्य हे केवळ मदत नाही, तर माणुसकीची सेवा आहे.

थोडे नवीन जरा जुने