“एक हात मदतीचा” उपक्रमांतर्गत दिवाळी फराळ वाटप

 


निराधार विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंदाची लहर; सामाजिक कल्याण एवं मानव संरक्षण संघाचा स्तुत्य उपक्रम

पिंपरी चिंचवड - दिवाळीच्या मंगलप्रसंगी, सामाजिक कल्याण एवं मानव संरक्षण संघ, पुणे यांच्या पुढाकारातून “एक हात मदतीचा” या संकल्पनेखाली अकोले तालुक्यातील विविध आश्रमशाळा व शैक्षणिक संस्थांतील निराधार विद्यार्थ्यांना दिवाळी फराळ वाटप करण्यात आले. या उपक्रमामुळे शेकडो विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले.

सहभागी शाळा:

कर्मवीर भाऊराव पाटील प्राथमिक व माध्यमिक आश्रम शाळा

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वांगदरी

गुरुकुल, जांभळं दरा

खंडोबाची वाडी, वेलदरी, मांडेवाडी

पिंपळदरी (चास), अकोले, जि. अहिल्यानगर

सहकार्य संस्थांचा हातभार:

सामाजिक कल्याण एवं मानव संरक्षण संघ, पुणे

अथर्व वॉटर टेक सोल्युशन्स, पुणे

श्री समर्थ शैक्षणिक व सामाजिक संस्था, पुणे

कॉन्फ्लुएन्स टेक्नॉलॉजी, तळवडे

वृंदावन मिसळ, पुणे

जय पॅकेजिंग, चिखली

कार्यक्रमाला लाभलेली मान्यवरांची उपस्थिती:

 कैलासराव शेळके – संचालक, अगस्ती साखर कारखाना

 बाळासाहेब शेळके – प्रथम लोकनियुक्त सरपंच, चास

 सुनीता मांडे – सरपंच, पिंपळदरी

 सुनील शेळके (माजी सरपंच), विजय दुर्गुडे, जगधने सर व इतर ग्रामस्थ

संघाच्या पुणे टीमचे सक्रिय योगदान: किशोर थोरात – पुणे जिल्हा अध्यक्ष (शहर)

 अमित कोकणे – पुणे जिल्हा अध्यक्ष (ग्रामीण)

 रविंद्र आळणे – डायरेक्टर, अथर्व वॉटर टेक, व जनरल सेक्रेटरी (शहर)

 भगवान वायकर – उपाध्यक्ष

 महेंद्र शेळके – पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष

 बाळासाहेब मोरे – सामाजिक कार्यकर्ते

प्रेरणादायी मनोगते:

 रविंद्र आळणे म्हणाले:

"हीच माझी जन्मभूमी आणि मातृभूमी. तिच्या ऋणातून काही अंशी मुक्त होण्याची संधी मिळाली, हे माझं परम भाग्य. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंदच माझं खऱ्या अर्थानं दिवाळी गिफ्ट आहे."

जिल्हा अध्यक्ष किशोर थोरात म्हणाले:

"शिक्षण आणि संस्कार यांच्या संगमातून हे विद्यार्थी उज्ज्वल भवितव्य घडवतील. दिवाळी फटाक्यांपेक्षा गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला मदत करणे, हीच खरी प्रकाशाची ज्योत आहे."

जिल्हा अध्यक्ष अमित कोकणे यांनी सांगितले:

"कलियुगात अध्यात्माचं महत्त्व अधिकच वाढले आहे. अध्यात्म हा पर्याय नाही तर गरज बनली आहे."

या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनात शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षकवर्ग, स्थानिक ग्रामस्थ व स्वयंसेवकांचे मोलाचे सहकार्य लाभले. गावकऱ्यांनी उपक्रमाचे खुले मनाने स्वागत करत उपस्थिती लावली.

राष्ट्रीय पातळीवरून अभिनंदन:

राष्ट्रीय अध्यक्ष राजेश कुंभरे, उपाध्यक्ष तेजस परमार व पश्चिम भारत अध्यक्ष अमोल माने यांनी पुणे टीमच्या उपक्रमाचे कौतुक करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

थोडे नवीन जरा जुने