वाकड ते मामुर्डी सर्व्हिस रस्त्याच्या कामाला गती, वाहतूक कोंडीतून होणार कायमची सुटका

 


आमदार शंकर जगताप यांनी पाहणी दौऱ्यात वेळेत काम पूर्ण करण्याचे दिले निर्देश


पिंपरी चिंचवड– चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे आमदार शंकर जगताप यांनी पुन्हा एकदा भूमकर चौक ते भुजबळ चौक परिसरात ऑन ग्राऊंड पाहणी करून कामांना वेग देण्याचे आदेश दिले. त्यांच्या सततच्या पाठपुरावामुळे  भागातील नागरिकांना वाहतूक कोंडीतून थोड्याफार प्रमाणावर दिलासा मिळाला आहे रस्त्याची कामे अतिक्रमणे रस्त्यावरील खड्डे बुजवणे सर्विस लाईन शिफ्ट करणे इत्यादी कामांमुळे वाहतूक सुरळीत होण्यास हातभार लागला आहे सदर परिसरातील उर्वरित ५०%उर्वरित कामांनाही फास्ट ट्रॅकवर घेण्यात येत आहे. त्यामुळे लवकरच नागरिकांना वाहतूक कोंडीच्या त्रासातून पूर्ण दिलासा मिळणार आहे.

गेल्या वर्षभरापासून वाकड-भूमकर चौक परिसरात वाढत्या वाहतूक कोंडीचा प्रश्न गंभीर बनला होता. या संदर्भात आमदार शंकर जगताप यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI), पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (PMRDA), पिंपरी-चिंचवड महापालिका (PCMC), महावितरण, वाहतूक पोलीस, आरटीओ ,यांसह विविध शासकीय यंत्रणांशी सतत समन्वय साधून उपाययोजना राबवल्या.

या पाठपुराव्याला आता ठोस परिणाम दिसू लागले आहेत. वीज कंपनीचे डीपी व ट्रान्सफॉर्मर शिफ्ट करणे, रस्त्यांची आखणी, खड्डे बुजविणे, अतिक्रमण हटविणे आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या ताब्यातील सर्व्हिस रोडवर प्रत्यक्ष काम सुरू करणे अशा अनेक महत्त्वाच्या टप्प्यांची अंमलबजावणी झाली आहे.

आजच्या स्थळ पाहणीत आमदार जगताप यांनी रस्त्यावरील झाडांची छाटणी व पुनर्रोपण, शोरूमसमोरील जागा ताब्यात घेणे, अतिक्रमण हटवणे, शिवनेरी एसटी बसस्टॉप शिफ्ट करणे, पीएमपीएमएलचे थांबे  मागील बाजूस योग्य ठिकाणी हलवणे, नवीन सर्विस रस्त्याच्या कामात मध्ये टीप टॉप इंटरनॅशनल हॉटेल जवळील कंटेनर हटवणे, एमएसईबीच्या सर्विस लाईन शिफ्ट करणे, ड्रेनेज लाईन  स्थलांतरित करून जोडणे , वाहन चालकांकरता नवीन कॅरेज वे तयार करणे,यासारख्या तातडीच्या सूचनादेखील दिल्या.

याशिवाय त्यांनी भुजबळ चौकात हिंजवडीकडे वळताना फ्री लेफ्ट देणे, हॉटेल सोनम जवळील अतिक्रमण काढणे, ४५ मीटर रस्त्याचा ताबा घेणे, चौकातील आयलंड कमी करणे, पीएमपीएमएल बस स्टॅन्ड मागे घेणे, महावितरणचा डीपी शिफ्ट करून केबल डक्टमध्ये टाकणे, रांजाई हॉटेलजवळील होर्डिंग काढणे, संयुक्त पाहणी करून डांबरीकरण करणे अशा महत्त्वाच्या सूचना केल्या. तसेच महामार्ग प्राधिकरणाने वाहतूक विभागाला काँक्रीट बॅरिकेड्स द्यावेत, खड्ड्यांमध्ये ब्लॉक बसवावेत, दोन बारा मीटर कॅरेज वे शनिवारपर्यंत क्लिअर करावेत, नगररचना विभागाने टप्प्याटप्प्याने जागा ताब्यात घ्यावी आणि संयुक्त अतिक्रमण कारवाई करावी, असे निर्देश दिले.

भुजबळ चौकातील ट्रान्सफॉर्मर मागे घेतल्यानंतर तातडीने रस्ता तयार करण्याचे आदेशही त्यांनी दिले. टू-व्हीलर वाहनचालक चुकीच्या बाजूने रस्ता ओलांडू नयेत यासाठी प्रतिबंधक उपाय करण्यास सांगितले. शिवनेरी बस रस्त्यावर उभी न करता आत थांबवणे, बस थांबा मागे शिफ्ट करणे, दुसऱ्या बाजूस हलवणे, पीएमपीएमएल बस स्टॅन्डवरच बस थांबवणे, महामार्ग प्राधिकरणाकडून पुशबॅकसाठी पत्र घेणे,

टीप टॉप इंटरनॅशनल हॉटेलकडील लेफ्ट फ्रीसाठी झाडे काढून पुनर्रोपण करणे, कंटेनर हटवणे, वृक्ष प्राधिकरणाची परवानगी घेऊन आठ-दहा दिवसांत योग्य ती कारवाई करावी, माने वस्ती एमजी शोरूमसमोरील वाहतुकीस अडथळा ठरणाऱ्या गाड्या क्रेन लावून उचलणे, मारुती सुझुकी शोरूमजवळील बॉटलनेक दूर करणे, झाडे-झुडपे हटवणे, महानगरपालिकेच्या डक्ट मधील मधील वीज कंपनीच्या केबल सोडून इतर केबल काढून टाकणे,  वाहतूक विभागाच्या समन्वयाने अतिक्रमण दूर करणे वआठवडे बाजारास परवानगी न देणे,  इत्यादी सूचना  आमदार जगताप यांनी दिल्या.

या पाहणीत पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त वाहतूक विवेक पाटील, शहर अभियंता मकरंद निकम, सह शहर अभियंता गट्टूवार साहेब,बीआरटीचे प्रमुख अभियंता बापू गायकवाड, महावितरण चे कार्यकारी अभियंता श्रीयुत मुंडे, राष्ट्रीय महामार्गाचे कार्यकारी अभियंता घंटे ,सहाय्यक अभियंता मोरे, महावितरणचे कार्यकारी अभियंता मुंडे, वाहतूक  पोलीस निरीक्षक श्री सोनवणे, एपीआय थोरात, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे ड क्षेत्रीय कार्यालय क्षेत्रीय अधिकारीअमित पंडित , एन एच आय जे कन्सल्टंट सुधीर आथळकर , डी एम आर कंपनीचे प्रोजेक्ट मॅनेजर राकेश चव्हाण , मनपाचे विभागाचे कार्यकारी अभियंता विनय ओव्हाळ, स्थापत्य विभागाचे कार्यकारी अभियंता सुनील शिंदे, बीआरटी विभागाचे सुनील पवार, आरोग्य विभागाचे शांताराम माने व इतर अधिकारी उपस्थित होते.

आमदार जगताप यांनी स्पष्ट केले की, “सध्या ५०% दिलासा नागरिकांना मिळत आहे. येत्या पंधरा-वीस दिवसांत उर्वरित कामे पूर्ण होऊन शंभर टक्के वाहतूक कोंडीतून मुक्तता मिळेल.”

आमदार शंकर जगताप यांच्या सततच्या पाठपुरावा आणि प्रत्यक्ष कृतीमुळे भूमकर चौकातील कामे आता फास्ट ट्रॅकवर आली आहेत. लवकरच नागरिकांना सहज व सुरळीत प्रवासाचा अनुभव मिळणार आहे.

--
मा.शंकर पांडुरंग जगताप 

आमदार : चिंचवड विधानसभा

थोडे नवीन जरा जुने