PCMC : चिंचवडगाव येथे गुणवंत विद्यार्थी सन्मान सोहळा’



 पिंपरी चिंचवड -‘चिंचवडचा राजा’ श्री. संत ज्ञानेश्वर मित्र मंडळ, चिंचवडगाव यांच्यावतीने आयोजित ‘चिंचवडगाव गुणवंत विद्यार्थी सन्मान सोहळा’ आणि प्रेरणादायी व्याख्यान “आई-बाप समजून घेतांना” यशस्वीरीत्या संपन्न

‘चिंचवडचा राजा’ श्री. संत ज्ञानेश्वर मित्र मंडळ, चिंचवडगाव यांच्या वतीने आयोजित ‘चिंचवडगाव गुणवंत विद्यार्थी सन्मान सोहळा’ आणि “आई-बाप समजून घेतांना” या विषयावरील प्रेरणादायी व्याख्यान — वक्ते डॉ. वसंत हंकारे सर — हा कार्यक्रम अत्यंत उत्साहपूर्ण, भावनिक आणि विचारप्रवर्तक वातावरणात यशस्वीरीत्या पार पडला.




या अर्थपूर्ण कार्यक्रमाला चिंचवडगावातील विद्यार्थी, पालक आणि नागरिकांनी हजारोंच्या संख्येने उपस्थित राहून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. कार्यक्रमाचे आयोजन मंडळाचे अध्यक्ष अॅड. मोरेश्वर शेडगे यांनी केले.

आजच्या वेगवान युगात पालक आणि लेकरांमधील संवाद, संवेदना आणि समजूत अधिक दृढ करण्याचा मोलाचा प्रयत्न या व्याख्यानातून झाला. डॉ. हंकारे सरांच्या विचारांनी उपस्थितांच्या अंतर्मनाला स्पर्श केला — अनेकांच्या डोळ्यांत पाणी आले आणि आत्मचिंतनाची नवी ज्योत प्रज्वलित झाली. गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करताना त्यांच्या यशामागे असलेल्या पालकांच्या अथक प्रयत्नांनाही सन्मान देण्याची संधी या सोहळ्यात मिळाली.



कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून पिं. चिं. भाजपा शहराध्यक्ष शत्रुघ्न बाप्पू काटे, विधान परिषद आमदार उमा खापरे, माजी खासदार अमर साबळे, चिंचवडच्या माजी आमदार अश्विनी लक्ष्मण जगताप, तसेच भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते व टाटा मोटर्स कामगार संघटनेचे माजी अध्यक्ष पै. ज्ञानेश्वर शेडगे, माजी नगरसेवक राजाभाऊ गोलांडे, पाटीलबुवा चिंचवडे, विठ्ठल भोईर, हेमंत डांगे, अजित कुलथे, रवींद्र देशपांडे, राजेश शिरोळे, महेश काका कुलकर्णी, नंदुकाका जेस्ते, विशाल गावडे, योगेश चिंचवडे, कैलास सानप, अमोल वाणी, शाम मिरजकर, अतुल मिरजकर, दीपक गावडे यांसह मान्यवर उपस्थित होते.

मंडळाचे उत्सव प्रमुख विठ्ठल सायकर, कार्याध्यक्ष महेशबापू मिरजकर, तसेच प्रमोदशेठ बरडिया, अविनाश तिकोने, योगेश मिरजकर, अजिंक्य राऊत, आदित्य मिरजकर, हर्षल मिरजकर, आनंद सायकर, दुर्गेश मिरजकर, अतुल कांबळे आणि मंडळाचे सर्व कार्यकर्ते यांचे प्रयत्न उल्लेखनीय ठरले.

सर्व नागरिक, पालक, विद्यार्थी बांधव आणि कार्यकर्त्यांच्या सहकार्याबद्दल मंडळाच्या वतीने मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले.


थोडे नवीन जरा जुने