आळंदी नगरपरिषदेस ७५ टक्के उत्साहात मतदान ; मतमोजणी लांबल्याने उमेदवारांत नाराजी



वडगावकरांच्या तीन पिठ्या लग्नामुळे मतदाना पासून वंचित ; ९४ वर्षाचे जेष्ठ मतदाराचे मतदान  

आळंदी (अर्जुन मेदनकर) : आळंदी नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीसाठी झालेल्या मतदानात ७५ टक्के मतदान झाल्याचे मुख्याधिकारी माधव खांडेकर यांनी सांगितले. 

  आळंदी नगरपरिषदेच्या वतीने प्रभाग क्रमांक १ ते १० मध्ये नगराध्यक्ष पदासह २१ सदस्य निवडण्यासाठी मतदान उत्साहात झाले. आळंदी नगरपरिषदेने मतदारांसाठी विविध सेवा सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. मतदारांचे स्वागत करण्यात आले. १८ वय वर्षावरील नवमतदारांसह ९४ वर्षे वयोवृद्ध जेष्ठ नागरिक, महिला, पुरुष, दिव्यांग बांधव यांनी देखील मतदान करीत लोकशाहीचे उत्सवात आपला सहभाग दाखविला. सेल्फी घेत नवमतदारानी मतदान केल्याचा संदेश देत इतरांनी मतदान करण्याचे आवाहन केले. 

 आळंदी शहरातील १० प्रभागातील मतदानासाठी ३० मतदान केंद्र तैनात करण्यात आली होती. या मतदान केंद्रावर मतदारांचे सोयीसाठी व्हील चेअर, दिव्यांग बांधवांसाठी एक हात मदतीचा या न्यायाने कर्मचाऱ्यांची नियुक्ती सेवाभावी वृत्ती जोपासत करण्यात आली होती. दिव्यांगांसाठी ये जा करण्यास रॅम्प ची देखील व्यवस्था होती. पिण्याचे पाणी, उन्हापासून संरक्षण व्हावे यासाठी मंडप व्यवस्था दक्षता घेत करण्यात आली होती. येथील एमआयटी कॉलेज मतदान केंद्र आदर्श आणि लक्षवेधी ठरले. 

   मागील विधान सभेस आळंदीतील मतदान केंद्रावर आजोबांनी मुलासह नातवाचे उपस्थितीत वडील, मुलगा आणि नातू अशा  तीन पिढ्यांनी मतदानाचा हक्क बजावला. मात्र यावेळी आळंदी नगरपरिषद निवडणुकीत वडगावकर कुटुंबियांचे येथे लग्न समारंभ असल्याने वडगावकर तीन पिढ्याचे मतदार मतदानाचा पासून वंचित राहिले. त्यांचे कुटुंबातील  ५० हुन अधिक मतदार लग्ना मुळे मतदानाचा पासून वंचित राहिले. तर दुसरीकडे  वय वर्ष ९४ आळंदी नगरपरिषदेचे माजी नगरसेवक ज्येष्ठ नागरिक मदनशेठ बोरुंदिया यांनी लोकशाही उत्सवात सहभागी होत उत्साहात मतदान करून इतरांना प्रेरणा दिली. त्यांची या पूर्वी दोन ऑपरेशन झाली असून पित्ताची पिशवी काढली आहे. नुकतेच हारण्याचे ऑपरेशन झाले आहे. ऑपरेशन होऊन चार-पाच दिवस झाले असताना ही आजाराचा विचार न करता प्रभाग क्रमांक दोन मध्ये मतदान करून इतराना प्रेरणा दिली. सर्वांनी लोकशाही उत्सवात सहभागी होण्याचे त्यांनी आवाहन केले. लोकशाही चे उत्सवातील मुख्य दिवस मतदान दिन असल्याने खऱ्या अर्थाने पुढील पाच वर्षाचे विकासाची धुरा ज्यांचे खांद्यावर द्यायची तो निर्णय घेण्याचा क्षण होता. अर्थात मत दान देण्याचा दिवस असल्याने मत दान देणाऱ्या मतदारांना आणि निवडणूक प्रक्रियेतील सर्व उमेदवारांना मतदान दिनाचे हार्दिक शुभेच्छा अनेक मतदारांनी देत मतदान प्रक्रियेत उत्स्फूर्त भाग घेतला. जेष्ठ नागरिक आदर्श शिक्षक एकनाथ घुंडरे ( वय ८७),पंढरीनाथ काकडे ( वय ८५ ) यांचेसह अनेक जेष्ठ नागरिकांनी मतदान करीत लोकशाही उत्सवात भाग घेतला.    

   


आळंदी नगरपरिषद हद्दीतील ( आळंदी हवेली - खेड )  मधील मतदार यांना जवळ असलेल्या ठिकाणी मतदान केंद्राची व्यवस्था करण्यात आली होती. यामध्ये श्री ज्ञानेश्वर विद्यालय, श्री ज्ञानेश्वर बालक मंदिर, नगरपरिषद शाळा क्रमांक एक मध्ये चार मतदान केंद्र होते. तसेच श्रीमती लक्ष्मीबाई विठ्ठलराव दुराफे विद्यालय, एमआयटी कॉलेज ( आळंदी हवेली ) मधील भागातील नागरिकांच्या सोयीसाठी मतदार केंद्र उभारण्यात आले होते. 

आळंदीत ३० मतदान केंद्राची व्यवस्था करण्यात आली होती. सकाळ पासून मतदारांनी रांगा लावून मतदान केले. यावेळी मतदारांनी सेल्फी पॉईंटवर सेल्फी घेत इतर मतदारांना  मतदान करण्याचे आवाहन करीत निवडणूक आयोगाचे निर्देशांचे पालन करीत मतदान करून लोकशाही उत्सवात मतदान करून आपला हक्क बजावण्याचे आवाहन आळंदी जनहित फाउंडेशन कार्याध्यक्ष अर्जुन मेदनकर, काँग्रेसचे शहर अध्यक्ष संदीप नाईकरे यांचेसह युवक, तरुण, वयोवृद्ध महिला, पुरुष यांनी हि मतदारांना आवाहन करीत मतदान केले.

   सकाळी सात वाजता मतदान सुरू झाल्यानंतर पहिल्या टन तासांत सुमारे १० टक्केवर मतदान झाले. उत्तरोत्तर मतदाराची टक्केवारी वाढत राहिली. आळंदी मध्ये दीड वाजे पर्यंत ४२,.८० टक्केवर मतदान झाले. १० हजार ८४१ मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क. मतदान संपण्याचे वेळी सुमारे ७५ टक्के मतदान उत्साही शांततेत झाले. यावेळी सर्व पक्षीय पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी खेळीमेळीचे वातावरणात मतदान प्रक्रिया पार पाडली. आळंदी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी माधव खांडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली विविध मतदान केंद्रावर मोठ्या प्रमाणात सेवा सुविधा मतदारांना उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. यामध्ये मंडप, पिण्याचे पाणी,दिव्यांग मतदारांचे सोयीसाठी  व्हिलचेअर, सेवक, दिव्यांग मतदारांसाठी वाहन व्यवस्था देखील करण्यात आली होती. अशी  माहिती अर्जुन घोडे यांनी दिली. मतदान काळात शांतता कायदा सुव्यवस्था, पोलीस बंदोबस्तासाठी आळंदी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भीमा नरके,  पोलीस नाईक मच्छिन्द्र शेंडे आदींनी काम पाहिले. श्री ज्ञानेश्वर विद्यालयासह आळंदीतील विविध मतदान केंद्रावर मतदारांनी रांगा लावून मतदान करीत लोकशाहीचे उत्सवात आपला सहभाग उत्साहात नोंदविला.

  मतदारांनी मी मतदान केले. तुम्ही सुद्धा मतदान करा. मतदान हे आपलं कर्तव्य आहे. त्यामुळे मतदान केलंच पाहिजे. असे सांगत इतरांना मतदान करण्याचे मतदान केंद्रातून मतदान करून बाहेर आल्या नंतर आवाहन केले. मतदान करून हातावरची शाई दाखवून अनेकांनी सेल्फी घेतले. आळंदी शहरातील विविध मतदान केंद्रात हिरकणी कक्ष देखील विकसित करून दक्षता घेण्यात आली होती. सायंकाळी मतदान प्रक्रिया वेळ संपल्याने मतदान केंद्रात प्रवेश देणे बंद करण्यात आले. या लोकशाहीचे उत्सवात मतदान करण्याचे भाग्य लाभले. लोकशाही जिंदाबाद असे अनेक मतदारांनी सांगितले. 

दुपारी काहीशी गर्दी मंदावली तर चार नंतर पुन्हा मतदान केंद्रात गर्दी वाढून मतदान संपण्याचे वेळी ७५ टक्के मतदान झाले. नगराध्यक्ष पदासह नगरसेवक पदांसाठी देखील आळंदीत जोरदार चुरशीची लढत उमेदवारांत होत आहे. उत्साही शांततेत मतदान प्रक्रिया पार पडली. मात्र मत मोजणी २१ डिसेम्बर ला होणार असल्याने उमेद्वारातून नाराजी व्यक्त झाली. आचार संहिता देखील कायम राहिल्याने यंत्रणेवर अधिक ताण येणार आहे. नागरिकांची नागरी कामे कामे विलंबाने होणार आहेत.

थोडे नवीन जरा जुने