Pune : मंथन फाउंडेशन तर्फे जागतिक एड्स दिनानिमित्त विविध कार्यक्रम

पुणे : (क्रांतीकुमार कडुलकर) :  मंथन फाउंडेशनतर्फे जागतिक एड्स दिनानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. या प्रसंगी मंथन फाउंडेशनच्या अध्यक्षा आशा भट्ट यांनी HIV संदर्भात संस्था राबवत असलेल्या उपक्रमांची तसेच राज्य आणि जागतिक स्तरावर संस्थेच्या कामाची घेतलेली दखल याबद्दल माहिती दिली.

जागतिक एड्स सप्ताहानिमित्त फाउंडेशनने रॅली, जनजागृतीपर कार्यक्रम, महिलांसाठी उपक्रम, राशन वितरण, महाविद्यालयीन स्तरावरील विशेष उपक्रम, पथनाट्य, तसेच आरोग्य तपासणी शिबिरे अशा अनेक उपक्रमांचे नियोजन केल्याचे त्यांनी सांगितले.

डॉ. प्रियांशा यादव, क्लस्टर प्रोग्राम मॅनेजर, जिल्हा एड्स नियंत्रण विभाग, पुणे यांनी जागतिक एड्स दिन २०२५ ची थीम —“अडथळ्यांवर मात करू, एकजुटीने एचआयव्ही/एड्सला लढा देऊ, नवं परिवर्तन घडवू!” —याबद्दल माहिती देत उपस्थितांशी सविस्तर संवाद साधला.

यानंतर डॉ. प्रियांशा यादव यांनी हिरवा झेंडा दाखवून रॅलीची सुरुवात केली, तसेच पुढे जनजागृतीपर मार्गदर्शनही करण्यात आले. या कार्यक्रमांतर्गत ७५ महिलांना राशनचे वाटप करण्यात आले.

सुधीर सरवदे, जिल्हा पर्यवेक्षक, यांनी जिल्हा स्तरावर चालू असलेल्या विविध सेवा व उपक्रमांबद्दल माहिती दिली.

दीपक निकम यांनी HIV पॉझिटिव्हिटीविषयी महिलांशी संवाद साधत त्यांना प्रोत्साहन दिले.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंथन फाउंडेशनच्या पौर्णिमा चौधरी, कविता मगर, सुवर्णा पवार, बाबू शिंदे, शुभांगी बाविस्कर, हर्षा, कल्पना, अर्चना आणि मीनाक्षी यांनी विशेष मेहनत घेतली.

मंथन फाउंडेशन 

#WorldAIDSDay #ManthanFoundation #Awareness #Support #HIVPrevention



थोडे नवीन जरा जुने