कॉ. डॉ. किशोर खिलारे अभिवादन सभा
मंगळवार दि. ०२ डिसेंबर २०२५
सायंकाळी ५.३० वा
Pune : एस एम जोशी सोशालिस्ट फाउंडेशन - सेमिनार हॉल, नवी पेठ, पुणे_________________________________
गोरगरीब, सर्वसामान्य जनतेला सदैव मदत करणारा डॉक्टर, जनताभिमुख आरोग्य व्यवस्थेसाठी सतत कार्यशील असणारा कार्यकर्ता, जन आरोग्य मंच पुणे जिल्हा अध्यक्ष व जन आरोग्य अभियानाचे सदस्य, जातीअंत संघर्ष समितीचे पुणे जिल्हा अध्यक्ष, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या पुणे जिल्हा कमिटीचे सदस्य कॉ. डॉ. किशोर खिलारे यांचे ता. २४ नोव्हेंबर रोजी हृदय विकाराच्या झटक्याने निधन झाले.
दलित, शोषित वंचित घटकांवर होणाऱ्या अन्याया विरोधात व जातीअंता साठीच्या लढ्यातही ते क्रियाशील होते.
कॉम्रेड किशोर खिलारे विद्यार्थी दशेत औरंगाबाद येथील घाटी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात असताना SFI मध्ये, नंतर मुंबई मध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या कामात सहभागी झाले. त्यानंतर ते पुण्यात आल्यानंतर त्यांनी YCM रुग्णालयात दीर्घ काळ आरोग्य सेवा दिली. त्यातही विशेषतः समाजातील तळच्या घटकातील रुग्णांना हवी ती मदत व योग्य आरोग्य सल्ला दिला. कोविडच्या काळात तर त्यांनी कित्येक रुग्णांना, चळवळीतील कार्यकर्त्यांना मोठी मदत केली.
अशा आपल्या प्रिय साथीला अभिवादन करण्यासाठी पुण्यात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, डॉ. किशोर खिलारे यांचे कुटुंबीय, मित्र परिवार, डाव्या पुरोगामी पक्ष संघटनांच्या वतीने मंगळवार दि. ०२ डिसेंबर २०२५ रोजी सायंकाळी ५.३० वाजता अभिवादन सभा आयोजित करण्यात आली आहे.
मंगळवार दि. २ डिसेंबर
सायंकाळी ५.३० वाजता
स्थळ : एस. एम. जोशी सोशालिस्ट फाऊंडेश - सेमिनार हॉल, पत्रकार भवनच्या शेजारी, नवी पेठ, पुणे.
.
