जागतिक अपंग दिनाच्या निमित्ताने दिव्यांग बांधवांना शुभेच्छा

 


पिंपरी चिंचवड - जागतिक अपंग दिनाच्या निमित्ताने आज विविध कष्टकरी दिव्यांग बांधवांना भेटून कामगार नेते काशिनाथ नखाते यांनी मनापासून त्यांना शुभेच्छा दिल्या. 

यावेळी मनपा समिती सदस्य किरण साडेकर,सामाजिक कार्यकर्ते नाना कसबे,ओमप्रकाश मोरया,लाला राठोड आधी उपस्थित होते.

दिव्यांग बांधवांची जिद्द संघर्ष,आणि आत्मविश्वासाला मनापासून सलाम करतो. समाजातील प्रत्येक दिव्यांग बांधव हा प्रेरणेचा स्रोत आहे. त्यांच्या हक्कांसाठी, सन्मानासाठी आणि समान संधींसाठी आपण सर्वांनी एकत्र येऊ असे मत नखाते यांनी व्यक्त केले.

थोडे नवीन जरा जुने