समता भूमी फुले वाड्यात विचारांचे दिप प्रज्वलित

 


पुणे -'जुने आदर्श घेऊनच नवी पिढी पुढे जाईल,मात्र आधीच्या पिढीने,संवादाची दारे उघडी ठेवावी' असे आवाहन,माध्यम तज्ञ भारत पाटील केले.

तरुणांमधील वाढती बेकारी,व्यसनाधीनता आणि उद्रेक या विषयावर ते फुले -आंबेडकर व्याख्यानमालेत बोलत होते.अध्यक्षस्थानी कष्टकरी कामगार नेते काशिनाथ नखाते होते.

पुढे बोलताना भारत पाटील यांनी. व्यसनाची व्याख्या बदलली असून,मोबाईल हे नवे व्यसन असून,त्या उद्योगाचेही केंद्रीकरण होत असल्याचे,निदर्शनास आणून दिले.त्यावर लक्ष जाऊ नये म्हणून,जातीजातीत भांडणे लावून दिली आहेत.कोवळी मुले भक्ष्यस्थानी पडत आहेत.याबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली.उच्च शिक्षणात कमालीची,घट झाली आहे.दहावी,बारावीनंतर विद्यार्थी,शाळा सोडल्याचा दाखला, आणायला देखील जात नसल्याचे सांगितले.मन उध्वस्त होत आहे.रिकामे हात,रिकामे मेंदू यामुळे नवी पिढी व्यसनाधीन होत आहे,त्यातून उद्रेक होण्याचा,धोका वाढला आहे.नेपाळ आणि बांगलादेश,ही त्याची उदाहरणे असल्याचे प्रतिपादन केले.जुन्या आदर्शांचा,आजही सन्मान केला जातो,त्यामुळे त्यांनी नव्या पिढीकडून,आशा व्यक्त केली आहे.

अध्यक्षस्थानावरून बोलताना,नखाते यांनी शासकीय धोरणांवर टीका केली.एका बाजूला रोजगार निर्मिती करायची नाही,आणि दुसऱ्या बाजूला, स्वयंरोजगारांना अटकाव करायचा. याची दखल समाजाने घेतली नाही तर,बेरोजगारांचा उद्रेक होईल,असा इशारा दिला. कामगार आणि व्यवस्थापन,यांच्यामध्ये न्यायालय न आणता,लवाद निर्माण केला आहे.लवाद हे सरकारी अपत्य असल्याची टीका त्यांनी केली.

कार्यक्रमाची सुरुवात फुले यांच्या अखंडाने झाली.

प्रास्ताविक भाषणात ओंकार मोरे यांनी,आजचा बेरोजगार युवक,द्विधा मनस्थितीत असल्याचे सांगितले.आदर्शांना समाजासमोर,उभे करायचे आहे,पण उपाशी पोटी,तो भरकटत आहे,त्यातून त्याचा उद्रेक होऊ शकतो,अशी भीती व्यक्त केली.

सूत्रसंचालन शारदा वाडेकर यांनी केले,

आभारप्रदर्शन प्रतिष्ठानचे हारुण मुजावर यांनी केले.

थोडे नवीन जरा जुने