जुन्नर (रफिक शेख) : पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण संदीप सिंह गिल यांनी जुन्नर तालुक्यातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी वारंवार गुन्हे करणारे ८ सराईत गुन्हेगारांना हद्दपार केले आहे.
जुन्नर पोलीस स्टेशन येथील सोयाबीन चोरी करणारे टोळी प्रमुख सुनील मोहन काळे रा. तलाखी कुसुर व त्याचे टोळीतील पाच खातेदार यांनी रात्रीची घरफोडी, शेतमालाची चोरी, टपरी, पत्र्याची चोरी, वारंवार गैर कृती केले आहे. पोलीस अधिनियम १९५१ कलम ५५ प्रमाणे हद्दपार करण्याचा प्रस्ताव पोलीस अधीक्षक यांच्याकडे सादर करण्यात आला.
यावेळी टोळी प्रमुखासह इतर आरोपी निलेश लक्ष्मण केवळ रा. निमदरी, साईनाथ विलास केवळ, रा. विकासवाडी, रवींद्र गोरक्ष केवळ, रवींद्र गोरक्ष केवळ, राजेंद्र रामदास केवळ, गोरक्ष उर्फ रविराज विजय मोघे यांना १ वर्षाकरिता पुणे जिल्हा, पिंपरी चिंचवड, पुणे शहर, ठाणे जिल्हा, अहिल्यानगर, पारनेर व संगमनेर तालुक्यातून हद्दपार केल्या बाबतचे आदेश दिले आहे.
त्याचप्रमाणे जुन्नर शहरातील अवैद्य गोवंश वाहतूक, गोवंश कत्तल आरोपी फारूक अब्बास कुरेशी व नाजिम रज्जाक बेपारी रा. खलीलपुरा यांनी बंदी असताना देखील मोठ्या प्रमाणावर अवैधरित्या केल्याने जुन्नर पोलीस स्टेशन येथे त्यांच्यावर प्राणी संरक्षण अधिनियम अंतर्गत गुन्हे दाखल केले आहे.
या आरोपींचे गैर कृत्य दिवसेंदिवस वाढत होत असल्याने त्यांच्याविरुद्ध पोलीस अधिनियम ११५१ चे कलम ५६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींना पुणे जिल्ह्यातून दिनांक २० नोव्हेंबर २०२५ ते १९ नोव्हेंबर २०२७ अशा दोन वर्षाच्या कालावधी करता हद्दपार करण्यात आले आहे.
अनुषंगाने शरीराविरुद्ध, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या मालमत्तेविरुद्ध, अवैद्य जुगार, अवैद्य दारू विक्री एन डी पी एस कायदे अंतर्गत गुन्हा दाखल असलेले एकूण २०० पेक्षा अधिक विरुद्ध बी एन एस एस कलम १२६ /१२९ प्रमाणे दारूबंदी अधिनियम ९३. प्रतिबंधक कारवाई बाबतचे प्रस्ताव पाठविण्यात आले आहे.
सदरची संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण संदीप सिंह गिल, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे यांच्या आदेशाने उपविभागीय अधिकारी साधनंजय पाटील, अविनाश शेळीमकर, पोलीस उपनिरीक्षक रघुनाथ शिंदे, पोलीस उपनिरीक्षक ऋषिकेश तिटमे पो हवा बनकर, स्थानिक गुन्हे शाखा पो. शि. शिंदे, पो. शि. विशाल चौधरी, पो. शि. बाबाजी नाईकवाडी या पथकाने कारवाई केली आहे.
