आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : येथील श्री नरसिंह सरस्वती सद्गुरु देवाचा वार्षिकोत्सव सोहळा रविवार ( दि.२८ ) पासून हरिनाम गजरात, धार्मिक प्रथा परंपरेने, वेदमंत्र जयघोषात सुरू झाला. या वर्षीचे सोहळ्यात कोठी पूजन करून उत्सवास सुरुवात झाली. भाविकांना श्रींचे दर्शन, महाप्रसाद, धार्मिक कार्यक्रमांची पर्वणी लाभणार आहे.
यावर्षी हि परंपरेने वैभवी श्रींचा रथोत्सव, श्रींची पालखी मिरवणूक, कीर्तन, भजनसेवा, अन्नदान - मुक्तद्वार अन्न संतर्पण महाप्रसाद वाटप होणार आहे.
वार्षिकोत्सवा निमित्त पहाटे श्रींना अभिषेक, दुधारती झाली. अवधुत चक्रांकीत यांचे विणा पहारा भजन, सात दिवस अखंड पहारा सुरू रहाणार आहे. शेखर यांचे नगारा वादन, मावडीकर दिनेश यांचे सनयी वादन झाल्यावर कोठी पुजा करण्यात आले. या वेळी विश्वस्त बाबासाहेब देशमुख, दिडोळकर, हवेले, पुजारी मुकुंद काका, सुधीर काका, विलास काका, कौस्तुभ, मनिष, योगेश, प्रशांत, कैवल्य गांधी परीवार, फडके गुरुजी, प्रथमेश गुरुजी, राम फडके, पाठशाळे तील विद्यार्थी. ग्रामस्थ,भक्त परिवार उपस्थित होते.
प्रथा परंपरांचे पालन करीत योगेश गांधी श्रींचे शेजघरात गुरुचरित्र पारायणास बसले आहेत. श्रींना लघुरुद्र अभिषेक झाला. त्या नंतर महानैवद्य दुपारी साडेबारा वाजता वाढविण्यात आला. दुपारी तीन वाजता गांधी पुजारी यांचे निवास स्थानातून दशमी, भाजीचा नैवेद्य श्रीनां दररोज दाखवला जाईल. सायंकाळी ह.भ.प.वासुदेव बुरसे यांचे कीर्तन सेवा, धुपारती, सनयी वादन, वेद सेवा, गांवकरी मंडळींची भजन सेवा रुजू होईल. खिरापत वाटप वार्षिकोत्सवात होत आहे.
