CSIR Bharti : राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा, पुणे येथे 34 विविध पदांसाठी भरती

राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा, पुणे येथे 34 विविध पदांसाठी भरती National Chemical Laboratory, Pune Recruitment for 34 Various Posts CSIR Bharti


CSIR NCL Recruitment 2025 :

राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा, पुणे (National Chemical Laboratory – NCL) अंतर्गत सन 2026 साठी भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली असून, विविध तांत्रिक पदांवरील एकूण 34 रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

ही भरती CSIR अंतर्गत राबविण्यात येत असून, टेक्निशियन आणि टेक्निकल असिस्टंट या पदांचा यामध्ये समावेश आहे. विज्ञान व तांत्रिक क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी ही एक महत्त्वाची संधी मानली जात आहे.

या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता पदानुसार वेगवेगळी असून, त्याबाबतची सविस्तर माहिती उमेदवारांनी मूळ जाहिरातीतून तपासणे आवश्यक आहे. अर्ज प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन असून, इच्छुक उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रांसह दिलेल्या मुदतीत अर्ज सादर करावा लागणार आहे. निवड झालेल्या उमेदवारांना शासन नियमांनुसार 9,300 ते 34,800 रुपयांपर्यंत वेतनमान देण्यात येणार आहे.

उमेदवारांचे वय 18 ते 28 वर्षांदरम्यान असणे आवश्यक असून, अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (SC/ST) उमेदवारांना 5 वर्षांची, तर इतर मागासवर्गीय (OBC) उमेदवारांना 3 वर्षांची वयोमर्यादेत सूट देण्यात आली आहे. ही नोकरी पुणे येथे असून, अर्ज शुल्क जनरल, OBC व EWS प्रवर्गासाठी ₹500 इतके आहे. मात्र SC/ST, दिव्यांग (PWD), माजी सैनिक (ExSM) तसेच महिला उमेदवारांसाठी कोणतेही अर्ज शुल्क आकारले जाणार नाही. इच्छुक व पात्र उमेदवारांनी 12 जानेवारी 2026 पर्यंत ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे.

-------------------------------------------------------------

अधिक माहितीसाठी - येथे क्लिक करा

अधिकृत वेबसाईट - येथे क्लिक करा

जाहिरात पाहण्यासाठी - येथे क्लिक करा

अर्ज करण्यासाठी - येथे क्लिक करा

-------------------------------------------------------------

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 7719223351 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअर’

● महत्वाच्या सूचना :

1. या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.

2. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.

3. उमेदवारांनी खालील दिलेल्या पत्त्यावर अर्ज सादर करावे.

4. अर्ज करण्याची शेवटची तारीख : 12 जानेवारी 2026

5. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.

6. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

थोडे नवीन जरा जुने