पिंपरी चिचंवड - अकोला जिल्ह्यातील कामगार क्षेत्रात कार्यरत असलेले विविध कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी आज कष्टकरी संघर्ष महासंघाच्या कार्यालयास सदिच्छा भेट दिली. या भेटीदरम्यान महासंघाच्या कार्यालयीन कामकाजाची सविस्तर माहिती त्यांनी जाणून घेतली. संघटनेच्या आजपर्यंतच्या कार्यपद्धती, कामगारांच्या हक्कांसाठी सुरू असलेले उपक्रम, आंदोलनात्मक भूमिका तसेच आगामी काळातील कार्यदिशा यावर सखोल चर्चा करण्यात आली.
महासंघाचे अध्यक्ष, कामगार नेते काशिनाथ नखाते यांनी या प्रतिनिधींचे सहर्ष स्वागत केले.
यावेळी अकोला जिल्हा आणि विविध तालुका प्रतिनिधी सचिन भुसारी, श्रीकृष्ण घारडे, सिंधू अधम, जीवन डूमालेशेख, समीर शेख, हुसेन शेख, शुभांगी मते, शारदा पाटील, शारदा काळे, अनिता खैरनार, अविनाश तायडे, रवी मोरे आदी मान्यवर कार्यकर्ते उपस्थित होते.
प्रदेश उपाध्यक्ष राजेश माने, नाना कसबे, किरण साडेकर,रोहन मुरगुंड,लाला राठोड यांनी आयोजन केले.
सदरच्या पाहणी दौर्यात कार्यकर्त्यांशी कामगारांच्या ज्वलंत प्रश्नांवर सविस्तर संवाद साधण्यात आला. कामगारांचे प्रश्न, अडचणी, कायदेशीर बाबी, सामाजिक सुरक्षा, संघटन बळकटीकरण, हजारोच्या संख्येने असलेले सभासद यांचा समन्वय यासंदर्भात सकारात्मक आणि मार्गदर्शक चर्चा झाली.
कामगारांच्या हक्कांसाठी एकजुटीने लढा देत राहण्याचा संकल्प या भेटीतून अधिक दृढ झाला.
