आदरणीय मतदार बंधु आणि भगिनी, सप्रेम नमस्कार..!!
पिंपरी चिंचवड म.न.पा ची सार्वत्रिक निवडणुक येत्या १५ जानेवारी २०२५ रोजी होत असुन प्रभाग क्र. १४ दत्तवाडी, काळभोरनगर, रामनगर चिंचवड या आपल्या प्रभागातुन देशातील सर्वात जुना क्रांतिकारक विचारांच्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाकडुन CPI(M) पक्षाच्या कार्याकर्त्या कॉम्रेड गुलनाज रजमुद्दीन शेख या महिला गटातुन नागरीकांचे प्रतिनिधित्व करण्यासाठी निवडणुकीला उभ्या आहेत. पक्षाच्या माध्यमातुन त्यांनी नागरीकांच्या अनेक समस्यांवर आंदोलने करून त्या सोडवण्यासाठी म.न.पा. ला अनेक वेळा भाग पाडले आहे. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष म्हणजे जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी कायम संघर्ष असे समीकरण पिंपरी चिंचवड शहरात निर्माण झाले आहे. स्वस्त घरकुलासाठी सलग ५ वर्ष आंदोलन करुन लाभार्थीना मिळवुण दिलेली चिखली येथील घरकुल वसाहत. रुग्णांची गैरसोय होत असल्याने आकुर्डीतील म.न.पा दवाखान्याचे विस्तारीकरण करण्याच्या मागणीसाठी पिंपरी येथे केलेले आंदोलन असो की, मुजोर रेशन दुकानदारांविरुध्द निगडीतील पुरवठा कार्यालयात केलेले आंदोलन या सर्व सामांन्याच्या हक्कांसाठी कायमच पक्षाने संघर्ष केला आहे.
कॉ. गुलनाज आर. शेख काम करत असलेल्या अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेमार्फत महिलांवरील अत्याचाराचे प्रकरणे बाहेर काढून त्या विरुध्द न्याय मिळण्यासाठी पोलिस प्रशासनाला वेळोवळी जागे करण्याचे काम केले आहे. कौटुंबिक हिंसाचार व वादांवर समुपदेशन करण्याचे काम महिलांची रेड ब्रिगेड स्थापन करुन महिला व मुलींची छेड काढणाराना वेळ पडल्यास चोप देऊन पोलिसांचे स्वाधिन करण्याचे काम देखील संघटने मार्फत केले आहे. घरकामगाराचे प्रश्न शासन दरबारी मांडून त्यांच्यासाठी कल्याणकारी मंडळ स्थापन करण्यास भाग पाडले आहे.तसेच प्रभागामध्ये आरोग्य, रक्तदान, आर.टी.ई. अॅडमिशन सारखे अनेक शिबिरे, क्रिडा स्पर्धा महापुरुषांचे जयंतीचे कार्यक्रम आयोजित केले आहे. कॉ. अपर्णा दराडे, कॉ. जयश्री साळुंखे, कॉ. सुष्मा इंगोले, कॉ. रंजीता लाटकर, कॉ.नुरजहा जम्खाने,कॉ. अरुणा बडीगेर, कॉ. चित्राताई जाधव, कॉ. यशोदा जोगी या संघटनेच्या कार्यकर्त्यांची फळी त्यांनी शहरात तयार केली आहे व जनतेचा आवाज प्रशासनापर्यंत पोहचवण्याचे काम पक्षाच्या मार्फत कॉ. गुलनाज आर. शेख करत आहेत.तरी आपण त्यांना भरघोस मतांनी मतदान करुन निवडून द्यावे हि विनंती..!!
पुढील पाच वर्षात खालील नागरी समस्येंवर पक्ष व कॉ. गुलनाज आर शेख काम करतील.
१. मुंबई म.न.पा. च्या धर्तीवर शहरातील ५०० चौ. फुटापेक्षा कमी क्षेत्रफळाच्या निवासी मालमत्तांना १०० % मालमत्ताकरात सुट व ८०० चौ. फुटापेक्षा कमी क्षेत्रफळाच्या निवासी मालमत्ता करात ५०% सुट मिळावी यासाठी प्रयत्न केले जातील वेळ पडल्यास आंदोलनात्मक भुमिका घेतली जाईल.
२. संत तुकाराम महाराज पालखीतील वारकऱ्यांच्या मुक्कामासाठी हक्काचे वारकरी निवास, इनडोअर कबड्डी स्टेडियम व पार्किंग व्यवस्था अशे बहुउददेशीय संकूल प्रभाग क्र. १४ मध्ये उभारणे.
३. प्रभागातील जुन्या झालेल्या विदयुत वाहिन्या डिपी बॉक्स, ट्रॉन्सफॉर्मर बदलून नवीन विदयुत वाहिन्या टाकणे. ४. पिंपरी चिंचवड शहरातील नागरीकांना शुद्ध व २४ तास पाणीपुरवठा होण्यासाठी पवना जलवाहिनी प्रकल्प राबवण्यासाठी पाठपुरावा करणार.
५. हिंदु हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना ओपीडी सेवा प्रभागात चालु करण्यास प्रयत्न केले जातील. ६. प्रभागातील सर्व इंग्रजी माध्यमातील शाळांना निवदेन देऊन आरटीई प्रवेश योजना राबवण्यासाठी जागृती करणार. म.न.पा. प्रशासनाने मराठी शाळेबरोबर इंग्रजी माध्यमाच्या शाळा सुरु कराव्यात व गोरगरीबाच्या मुलांना मोफत इंग्रजीतही शिक्षण मिळावे यासाठी प्रयत्न करणार.
७. म.न.पा.तील भ्रष्ट कारभार विरुध्द संघर्ष करणार व नागरीकांनी कर रुपात भरलेल्या पैश्याची उधळपट्टी थांबवणार.

