पिंपरी चिंचवड - थोर समाजसुधारक व स्वातंत्र्यसेनानी पांडुरंग सदाशिव साने (साने गुरुजी) यांनी शिक्षणाला केवळ नोकरीपुरते न मर्यादित ठेवता माणूस घडवण्याचे साधन म्हणून समाजासमोर मांडले. आणि माणसे घडवण्याचे काम केले असे मत कामगार नेते काशिनाथ नखाते यांनी व्यक्त केले.
साने गुरुजी यांनी जात-पात, धर्मभेद आणि शोषणाविरुद्ध संघर्ष करताना करुणा, प्रेम आणि माणुसकीची शिकवण साने गुरुजी यांनी दिली.
साने गुरुजी हे मराठी साहित्यातील एक अजरामर व्यक्तिमत्व मानले जातात, ज्यांनी आपल्या साहित्य, शिक्षण आणि सामाजिक कार्यातून समाजाला प्रेरणा दिली. त्यांचे कार्य विशेषतः बालसाहित्य, सामाजिक सुधारणा आणि स्वातंत्र्यलढ्यातील योगदानासाठी प्रसिद्ध आहे. कष्टकरी संघर्ष महासंघ महाराष्ट्र, महाराष्ट्र फेरीवाला क्रांती महासंघ,असंघटित कामगार संघातर्फे आज जयंतीनिमित्त साने गुरुजींना अभिवादन करण्यात आले. यावेळी कामगार नेते काशिनाथ नखाते, प्रदेश उपाध्यक्ष राजेश माने,सोनवणे, लाला राठोड, दिलीप देसाई,अनिल कदम, वसंत जाधव,वंदना कोळी, अनिता भोसले, सुदाम मोरे आदी उपस्थित होते.
