पिंपरी चिंचवड : सध्या आपण एका अतिशय वादळी आणि धोकादायक परिस्थिती तून जात आहोत. सर्वसामान्य माणसाच्या दैनंदिन आणि जगण्याच्या प्रश्नाकडे सरकार जाणूनबुजून दुर्लक्ष तर करीत आहेच; परंतु या प्रश्नांच्या बाबतीत जनतेने आवाज उठविण्याच्या लोकशाही आणि संविधानिक मार्गावरही गदा आणीत आहे. त्यामुळे या देशाच्या निरनिराळ्या व्यवस्थांवरचा लोकांचा विश्वास उडत चालला आहे
सरकार, निवडणूक आयोग, न्यायव्यवस्था, प्रसारमाध्यमे यावरचा लोकांचा विश्वास उडत चालला आहे. ईव्हीएम घोटाळा, मत चोरी, मतदार याद्यांची फेर पडताळणी, विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी तयार केलेला जनसुरक्षा कायदा, कामगार वर्गाचे गेल्या १०० वर्षात लढून मिळवलेले हक्क दाबण्यासाठी तयार केलेल्या चार कामगार संहिता, शेती क्षेत्रामध्ये बड्या भांडवलदारांचा शिरकाव करण्यासाठी सरकारचे चाललेले सातत्याचे प्रयत्न, महापूर - अतिवृष्टी यांनी उध्वस्त झालेल्या शेतकर्यांना कर्जमाफी नाकारण्याचे सरकारचे चाललेले प्रयत्न - हे व इतर असंख्य प्रश्न सामान्य माणसाला भेडसावत असताना सरकारचे धार्मिक ध्रुवीकरणाचे प्रयत्न चालले आहेत. निवडणुका जवळ आल्यावर पुलवामा - पहेलगाम हल्ला या सारख्या घटना घडत आहेत. अनेक वर्षे झाली तरी ना या घटनांचा तपास, ना कोणाला शिक्षा. लोकशाहीच्या नावाखाली हुकूम शाही आणण्याचे जोरदार प्रयत्न चालू आहेत? या सर्व परिस्थिती विरूद्ध म्हणावे असे जोरदार आंदोलन होताना दिसत नाही. विरोधी पक्ष अधूनमधून मोहिमा काढतात. पण त्यात सातत्य व आक्रमकता नाही.
या सर्व परिस्थिती विरुद्ध आता विरोधी पक्षांबरोबर छोट्या मोठ्या संघटना व कार्यकर्ते यांनी एकत्र येऊन आंदोलने करायला पाहिजेत. त्यासाठी पिंपरी चिंचवड मधील कार्यकर्त्यांनी एक मीटिंग बोलवून या प्रस्तावावर विचार करावा असे आम्हाला वाटते. त्या दृष्टीने विचार व्हावा हीच अपेक्षा.
स्थळ - लोकशाही वाचवा संविधान वाचवा
कार्यकर्त्यांची मीटिंग
विषय - सद्यस्थितीतील प्रश्न व आव्हाने
वेळ - रविवार दि. १४ डिसेंबर, सायंकाळी ५ वा.
स्थळ - डॉ बेरी बिल्डिंग, आकुर्डी
आपले
डॉ सुरेश बेरी सचिन देसाई सुधीर मुरुडकर उत्तम जोगदंड सावित्री जोगदंड वसंत कदम सुरेश बावनकर
राम नलावडे गोकुळ बंगाळ
