पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवड महानगरपालिका शिक्षण मंडळ समितीचे माजी सदस्य शिरीष विश्रामराव जाधव (वय ७३ वर्षे) यांचे बुधवारी (दि.१६) निधन झाले. राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार यांचे कट्टर समर्थक अशी शिरीष जाधव यांची ओळख होती.
१० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापन झाला, तेंव्हा पासून शेवटपर्यंत जाधव यांनी पिंपरी चिंचवड शहर सरचिटणीस म्हणून पक्षाचे काम पाहिले. ज्येष्ठ नेते आझमभाई पानसरे यांनी २०१२ ते २०१७ या काळात पिंपरी चिंचवड मनपा शिक्षण मंडळ समिती सदस्यपदी त्यांची निवड केली होती. त्यांच्या मागे पत्नी, एक मुलगी, एक भाऊ आणि एक विवाहित बहिण असा परिवार आहे.
