बारामती आणि इंदापूर मतदार संघात नाव गेलेल्या दाम्पत्यांनी घेतली पुण्यात भेट
Pune : मतदार यादीतील गंभीर अनियमितता, नावे वगळणे आणि वेळोवेळी होणाऱ्या चुका याबाबत नागरिकांमध्ये निर्माण झालेल्या नाराजीची दखल घेत आज पुणे येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय नेते, यांची विशेष भेट घेण्यात आली.
या भेटीसाठी पिंपरी–चिंचवड शहराध्यक्ष तुषार कामठे, युवक शहर अध्यक्ष इम्रान शेख तसेच ज्यांची नावे मतदार यादीतून वगळण्यात आली ते राबिया शेख व युनूस शेख सोबत उपस्थित होते. शहरातील मतदार यादीमध्ये झालेले घोळ,अनेक नागरिकांची नावे अचानक वगळणे, स्थलांतराची चुकीची नोंद, तसेच नव्या मतदार नोंदणींच्या प्रक्रियेत होणाऱ्या विलंबाबाबत सविस्तर माहिती पवार साहेबांना देण्यात आली.
नेत्यांनी याबाबत गांभीर्याने चर्चा केली असून संबंधित प्रशासनाकडून तात्काळ दुरुस्ती करून नागरिकांना योग्य सुविधा मिळाव्यात, यासाठी योग्य पावले उचलली जातील,अशी माहिती पदाधिकाऱ्यांकडून देण्यात आली.
मतदार यादीतील त्रुटींमुळे अनेक नागरिकांना मतदानाच्या घटनात्मक अधिकारापासून वंचित राहावे लागते, म्हणूनच हा मुद्दा थेट पवार साहेबांच्या ध्यानात आणून देण्यात आला. शहराध्यक्ष तुषार कामठे यांनीही तातडीने उपाययोजनांची आवश्यकता असल्याचे नमूद केले. यावेळी बोलताना इम्रान शेख म्हणाले”मागणी न करता इच्छुक उमेदवारांचे मतदार यादीतून परस्पर नाव दुसऱ्या मतदार संघात टाकणे ही लोकशाहीची हत्या असून नागरिकांचे मतदानाचे अधिकार काढून घेणाऱ्या दोषी व्यक्तीवर कडक कारवाही झाली पाहिजे.
