मुंबई : टाटा मोटर्सने अलीकडेच आपली बहुप्रतिक्षित SUV टाटा सिएरा लॉन्च केली आहे. लॉन्चनंतर कंपनीने बुकिंग सुरू केली आणि अवघ्या 24 तासांत सिएराला 70,000 पेक्षा जास्त बुकिंग्स मिळाल्या आहेत. Tata Sierra ही गेल्या काही काळापासून चर्चेत असलेली SUV होती आणि या गाडीला जबरदस्त प्रतिसाद मिळत असल्याचे दिसत आहे. आता 70,000 बुकिंग्ससह ही चर्चा ग्राहकांच्या खऱ्या उत्साहात बदलली आहे.
Tata Sierra चे पॉवरट्रेन
टाटा सिएरा तीन इंजिन पर्यायांसह उपलब्ध आहे. यामध्ये
1.5 लिटर Kryojet डिझेल इंजिन,
1.5 लिटर TGDi हायपेरियन पेट्रोल इंजिन,
आणि 1.5 लिटर NA रेवोट्रॉन पेट्रोल इंजिन यांचा समावेश आहे.
काही दिवसांपूर्वीच या गाडीच्या किमती जाहीर करण्यात आल्या असून, सिएरा अनेक व्हेरिएंट्समध्ये उपलब्ध आहे. ही SUV पूर्णपणे नवीन प्लॅटफॉर्मवर आधारित असून, भविष्यात यात AWD (ऑल-व्हील ड्राइव्ह) पर्याय देण्याचीही शक्यता आहे.
पॉवरट्रेनच्या बाबतीत सिएरामध्ये मोठे बदल करण्यात आले आहेत, विशेषतः पेट्रोल इंजिन पर्यायांमध्ये. यात नवीन 1.5 लिटर नेचरलि अॅस्पिरेटेड पेट्रोल इंजिन आणि नवीन 1.5 लिटर टर्बो पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. टर्बो पेट्रोल इंजिनसोबत नवीन टॉर्क कन्व्हर्टर गिअरबॉक्स देण्यात आला आहे, तर NA पेट्रोल इंजिनमध्ये DCA ऑटोमॅटिक गिअरबॉक्स मिळतो.
कसे आहेत गाडीचे फीचर्स?
फीचर्सच्या बाबतीतही टाटा सिएरा खूपच पुढे आहे. यात प्रवाशांसाठी एक्स्ट्रा टचस्क्रीनसारखी आधुनिक फीचर्स देण्यात आली आहेत. आपल्या सेगमेंटमध्ये सिएराची स्पर्धा हुंडाई क्रेटा आणि मारुती सुझुकी विक्टोरिस सारख्या गाड्यांशी होणार आहे.
मोठ्या प्रमाणावर बुकिंग झाल्यामुळे, आता बुकिंग करणाऱ्या ग्राहकांना लांब वेटिंग पीरियड सहन करावा लागू शकतो. अंदाज आहे की सिएराचे पेट्रोल व्हर्जन सर्वाधिक विकले जातील, मात्र डिझेल व्हेरिएंटदेखील विक्रीत मोठे योगदान देणार आहे.
