पिंपरी चिंचवड : महापालिका सार्वत्रिक निवडणुक २०२६ निमित्ताने, पिंपरी चिचवड राष्ट्रवादी कॅाग्रेस पार्टीचा शहरातील सर्वात पहिला पॅनेल जाहीर करून आज दि. २१ डिसेंबर २०२५ रोजी प्रभाग क्र २८ पिंपळे सौदागर रहाटणी मधील राष्ट्रवादी कॅाग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार १) सर्वसाधारण पुरूष श्री. विठ्ठल उर्फ नाना काटे , २) सर्वसाधारण ओबीसी प्रवर्ग सौ. मिनाक्षी अनिल काटे, ३) सर्वसाधारण महिला सौ. शितलताई नाना काटे, ४) सर्वसाधारण महिला सौ. सायली उमेश काटे, यांच्या प्रचाराचा शुभारंभ राष्ट्रवादी काँग्रेसपक्षाचे प्रचार प्रमुख, मा. विरोधी पक्षनेते श्री. विठ्ठल उर्फ नाना काटे यांच्या हस्ते अखंड हिदुंस्तानचे अराध्यदैवत छत्रपती श्री शिवाजी महाराजाचा पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून व पिंपळे सौदागरचे ग्रामदैवत श्री मुजोबां महाराज यांच्या मंदीरात श्रीफळ वाढवुन प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला, यावेळी पिंपळे सौदागर गावठाण पासुन पदयात्रेस सुरूवात करून उपस्थित ग्रामस्थ,परिसरतील नागरिक याच्या समवेत संपुर्ण परिसरात प्रचारफेरी घेण्यात आली तसेच यावेळी प्रचारफेरी दरम्यान पॅनल मधील उमेदवाराचे नागरिकांचा वतीने जागोजागी औक्षण करण्यात आले, या प्रचारफेरीस परिसरातिल नागरिकांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळाला,
यावेळी उपस्थित ग्रामस्थ व नागरिकांना पॅनल प्रमुख तसेच प्रचार प्रमुख श्री विठ्ठल उर्फ नाना काटे यांनी संबोधित केले की शहरातील सर्व प्रभागात ५० टक्के आरक्षणानुसार २ महिला व २ पुरूष असे उमेदवार आहेत परंतु पिंपरी चिंचवड शहरातील एकमेव प्रभाग हा प्रभाग क्र २८ पिंपळे सौदागर रहाटणी हा आहे की ईथे ३ महिला व १ पुरूष असा पॅनल असणार आहे त्यामुळे आपल्या या राष्ट्रवादी कॅग्रेस पार्टीचा पॅनल ला संपुर्ण शहरातील सर्वात जास्त बरघोस मतांनी निवडुन देण्यात यावा असे आवाहान करण्यात आले.
