कष्टकरी संघर्ष महासंघ महाराष्ट्रची राज्यात बांधणी.
पिंपरी चिंचवड - असंघटित कामगारांसाठी लढाऊ, व आक्रमकपणे कार्य करणारी संघटना कष्टकरी संघर्ष महासंघ महाराष्ट्र च्या जालना जिल्हा अध्यक्षपदी भगवानराव नागोराव काळे यांची निवड करण्यात आली आहे .
कष्टकरी संघर्ष महासंघ महाराष्ट्र ही बांधकाम कामगार,घरेलू कामगार, कंत्राटी कामगार,रिक्षा चालक,फेरीवाला, यांच्या न्याय हक्कासाठी अनेक वर्षांपासून प्रयत्नशील असून ४५ हजार सभासद संख्या असलेल्या या संघटनेच्या जालना जिल्ह्याचे अध्यक्षपदी काळे यांची निवड करण्यात आली आहे. काळे यांच्या बांधकाम कामगार, शेतमजूर, व सामाजिक क्षेत्रातील कामाची दखल कष्टकरी संघर्ष महासंघाने घेऊन जिल्हा अध्यक्षपदी निवड करण्यात येत आहे. महाराष्ट्र राज्यात सुमारे १४ जिल्ह्यात संघटनेचे काम सुरू असून या निवडीने पुन्हा कामगाराचे हितासाठी लाभदायी ठरणार आहे.
पत्रात नमूद केले आहे की आपल्यावरील दिलेली जबाबदारी व संघटना वाढीचे उद्दिष्ट आपण पूर्ण कराल तसेच सर्वसामान्य बांधकाम कामगार , व इतर सर्व कामगार यांना न्याय देण्याच्या दृष्टिकोनातून संघटना वाढीसाठी आपण प्रयत्नशील राहाल. आपण संघटनेचे ध्येय धोरणे व शिस्तीचे पालन करून संघटना बळकटीसाठी एकनिष्ठ राहून कार्य करावे.
मध्यवर्ती कार्यालय पुणे येथे निवडीबद्दल हार्दिक अभिनंदन करून कामगार नेते काशिनाथ नखाते, प्रदेश उपाध्यक्ष राजेश माने यांनी पत्र देऊन भावी कार्यासाठी मोरे यांना हार्दिक शुभेच्छा दिल्या.
