मरकळ श्री केशवराज शिक्षण संस्थेच्या वार्षिक स्नेहसंमेलनाची सांगता उत्साहात

 


आळंदी (अर्जुन मेदनकर) : मरकळ ( ता. खेड ) येथील श्री केशवराज शिक्षण संस्थेच्या नवीन माध्यमिक व उच्चं माध्यमिक व पवनसुत इंग्लिश मीडियम स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभ विविध उपक्रमांनी साजरा झाला. या वेळी संस्थेस आई - वडिलांचे स्मरणार्थ १ लाख ५१ हजार रुपयांची देणगी सुपूर्द करण्यात आली. 

 या उपक्रमाचे खास वैशिष्ट्ये म्हणजे केशवराज शिक्षण संस्थेचे माजी अध्यक्ष व संचालक अँड. विष्णू तापकीर यांनी आपल्या आई वडिलांचे स्मरणार्थ चऱ्होली गावचे माजी सरपंच कै भिकोबा शंकर तापकीर व कै भीमाबाई भिकोबा तापकीर यांचे स्मरणार्थ शिक्षण संस्थेस १ लाख ५१ हजार रुपयांची देणगी दिली. या देणगीचा धनादेश खेडचे सभापती विजयसिंह शिंदे पाटील यांचे हस्ते सचिव राहुल शिंदे यांचे कडे सुपूर्द करण्यात आला. या वेळी अनेक मान्यवरांनी संस्थेस देणग्या दिल्या. या वेळी संस्थेचे अध्यक्ष डॉ. गुरुदास नूलकर, संस्थेचे संचालक, नामदेव शिंदे, माजी पंचायत समिती सदस्य तुकाराम वहिले,सुभाष घेनंद, शंकरराव लोखंडे, दशरथ लोखंडे, संभाजी भुसे, सुजित लोखंडे, एकनाथ वर्पे, पांडुरंग लोखंडे, जितेंद्र भुसे, सरपंच हनुमंत लोखंडे, विजय कारिया, भरत कड, प्राचार्या छाया लाटे, प्राचार्य मिलिंद नखाते, माजी सरपंच सोमनाथ मुंगसे आदी मान्यवर उपस्थित होते. 

  या वर्षी लोकनृत्य कला संवर्धन उपक्रम राबविण्यात आला. यात श्री केशवराज महाराज करंडक लोकनृत्य स्पर्धेचे उत्साहात आयोजन करण्यात आले. सांस्कृतिक वारसा जपणाऱ्या पवनसुत इंग्लिश मीडियम स्कूलने या स्पर्धेच्या माध्यमातून शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करण्यात आले. या मध्ये परिसरातील १२ शाळांनी सहभाग घेतला. यावेळी विज्ञान व रांगोळी प्रदर्शन उत्साहात पार पडले.

थोडे नवीन जरा जुने