भाविक, नागरिकांत नाराजी ; राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाचे दुर्लक्ष
आळंदी (अर्जुन मेदनकर) : येथील तीर्थक्षेत्र आळंदीतील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या पवित्र इंद्रायणी नदीला वाढत्या अस्वच्छतेने, नदीतील जल प्रदूषणाने अपवित्रतेचे ग्रहण लागले असून नदीला जल प्रदूषण वाढल्याने इंद्रायणी नदी पुन्हा पांढऱ्या फेसाने फेसाळली आहे. नदीत मोट्या प्रमाणात राडा रोडा टाकला जात असून नदीचे पात्र उधळ आणि अरुंद होत असताना राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ, आळंदी नगरपरिषद प्रशासन डोळेझाक करीत असल्याने भाविक वारकरी आणि नागरिकांतून नाराजी व्यक्त होत आहे.
आळंदीतील फेसाळलेल्या इंद्रायणी नदीने नदी प्रदूषण वाढल्याची जाणीव प्रशासनास करून दिली असून देखील पुणे जिल्हा प्रशासन आणि राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ नदी प्रदूषण मुक्त करण्याचे यूआय योजनांसाठी बघ्याची भूमिका घेत आहे. प्रत्यक्ष नदी प्रदूषण मुक्त करण्या ऐवजी नदी काठ विकासातून काय साधणार असे सवाल नागरिकांतून व्यक्त होत आहेत.
आळंदीतील विविध पुलांचे निर्मितीचे वेळी पडलेला राडा रोडा तसाच नदीत पडून असून नदीचे दुतर्फ़ा आळंदीत नदी पात्रात राडा रोडा ढकलून नदी पात्र अरुंद करण्याचा घाट प्रशासनाने घातला आहे. पूर नियंत्रण रेषेत बांधकामे होत असून देखील नगरपरिषद प्रशासन बघ्याची भूमिका घेत असल्याने भाविकांतून आश्चर्य व्यक्त होत आहे. येथील जुन्या दगडी पुला लागत अनाधिकृत बांधकाम सुरु असून देखील आळंदी नगरपरिषद केवळ बघ्याची भूमिका घेत असून प्रशासकीय कामकाजावर नागरिकांतून नाराजीचा सूर उमटत आहे. नदी पात्रात सर्व प्रकारचा कचरा थेट टाकला जात असून जय गणेश मंदिरा लगत नदी पात्रात घाणीचे साम्राज्य पसरलेले असून या ठिकाणी प्रभावी स्वच्छता मोहीम राबविण्याची मागणी नागरिकांतून जोर धरत आहेत.
इंद्रायणी नदी वरील श्री स्वामी महाराज घाट लगत पुलाचे भुयारी मार्ग नागरिकांना सुरक्षित सुरळीत रहदारी साठी वापर योग्य करून देण्याची मागणी असताना या कडे प्रशासन डोळेझाक करीत आहे. काही वर्षा पूर्वी ऐन कार्तिकी यात्रेत सदर ठिकाणी पुलाचे पुढील रस्ता ओलांडताना अज्ञात वाहनाने जबर धडक दिल्याने एका वारकरी महिलेचा बळी गेला असताना देखील नगरपरिषद प्रशासनाचे डोळे उघडत नाही. येथील रहदारी आणि वाहतूक कोंडी फोडण्यासाठी भाविक वारकरी यांचे साठी पुला खालील दोन ठिकाणचे भुयारी मार्ग सब वे वापर योग्य करून रहदारीला तात्काळ खुले करण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.
इंद्रायणी नदीत पिंपरी चिंचवड महानगरपरिषद हद्दीतून थेट रसायन व मैला मिश्रित सांडपाणी नदीत सोडले जात असल्याने नदी पांढऱ्या फेसाने पुन्हा एकदा फेसाळली. यात केमिकल रसायन मिश्रित पाणी थेट नदीत सोडले जात असल्याने भाविक, नागरिकांत नाराजीचा सूर उमटत आहे.
आळंदीतील इंद्रायणी नदीत जलपर्णी ची समस्यां देखील महापालिकेच्या दुर्लक्षाने कायम असते. आळंदीत स्वच्छता, उपाय योजने कडे शासनाचे दुर्लक्ष होत असल्याने स्थानिक स्वराज्य संस्थांचे कामकाजावर तसेच राज्य शासनाचे धोरणावर भाविक ताशेरे ओढत आहेत. इंद्रायणी घाटाची तोडफोड करून घाटाची विद्रुपता वाढवली असून वारकरी संस्थानी शासनाचा निषेध देखील केला आहे. मात्र याकडे शासनाची डोळेझाक होत असून इंद्रायणी नदी प्रदूषण मुक्त साठी होणारे प्रयत्न विविध सेवाभावी संस्थानी आंदोलने सुरु करून वाढविले आहे. या संदर्भात आळंदीतील जनहित फाउंडेशनचे वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, एकनाथजी शिंदे यांना वेळोवेळी निवेदने देऊन त्यांचे हि लक्ष वेधण्यात आले आहे.
इंद्रायणी नदीचे जलप्रदूषण वाढल्याने भाविक, वारकरी आणि नागरिकांतून नाराजी व्यक्त होत आहे. पिंपवड महापालिका आणि राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाचा अंकुश प्रदूषण करणाऱ्या घटकांवर राहिला नसल्याने वारंवार नदी पांढऱ्या शुभ्र प्रदुषित पाण्याने फेसाळत आहे. आळंदीत इंद्रायणी नदीतून नगरपरिषदेच्या पाणी साठवण बंधाऱ्यात प्रचंड प्रदूषित पाणी पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीतून येत आहे. इंद्रायणी नदीवरील पाणी साठवण बंधारा अनेक ठिकाणी दगड निखळले आहेत. यामुळे गळती असून सद्या पाणी पुरवठ्याचा प्रश्न निकाली निघाला असला तरी नदीचे वाढते प्रदूषण तीर्थक्षेत्र विकासाची शोकांतिका उघड करीत आहे. देखभाल दुरुस्ती अभावी नदी वरील भक्त पुंडलिक मंदिर परिसरात पाणी साठविण्यावर बंधारा गळतीने मर्यादा आली आहे. येथील बंधा-यासह कोल्हापूर पद्धतीचे बंधा-याचे गळती रोखण्यासह पाणी पुरवठा केंद्राकडील बंधाऱ्याची देखील देखभाल दुरुस्ती करण्याची मागणी होत आहे.
तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातून इंद्रायणी नदीचे वाढते प्रदूषण रोखण्याची उपाययोजना करण्याचे मागणीसह नदी प्रदूषण रोखण्याची मागणी नमामि इंद्रायणी प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष अर्जुन मेदनकर, आळंदी जनहित फाउंडेशन अध्यक्ष राजेंद्र घुंडरे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कडे केली आहे. मात्र पुणे जिल्हा प्रशासनाचे नदी प्रदूषण रोखण्याचे उपाय योजनांकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे.
आळंदी हे तीर्थक्षेत्र असल्याने येथे वर्षभर भाविक श्रींचे मंदिरात दर्शनासह तीर्थक्षेत्रातील स्नान महात्म्य जोपासण्यास येतात. आळंदीतून इंद्रायणी नदी वाहते. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या हद्दीतून नदीत थेट मैला व रसायन मिश्रित सांडपाणी सोडले जात आहे. पिंपरी चिंचवड महापालिका सांडपाण्यावर प्रक्रिया न करता थेट नदीत सांडपाणी व रसायन, मैला, मिश्रित पाणी सोडले जात असल्याने नदी प्रदूषण प्रचंड वाढले आहे. रविवारी ( दि. ४ ) इंद्रायणी नदी पुन्हा पांढऱ्या रंगाचे फेसाने फेसाळल्याने नदी प्रदूषणाने धोक्याची पातळी ओलांडल्याने नदी प्रदूषण वाढले आहे. वाढत्या जल प्रदूषणाने अलंकापुरीत भाविक व नागरिकां मधून नाराजी व्यक्त केली जात असल्याचे सामाजिक कार्यकर्ते विचारसागर महाराज लाहुडकर यांनी सांगितले.
राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाचे दुर्लक्षाने नदी प्रदूषण वाढले
महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाचे दुर्लक्षाने इंद्रायणी नदीचे प्रदूषणात वाढ झाली आहे. नदीतील जलप्रदूषित करणाऱ्या घटकावर गुन्हे दाखल करून कारवाई अभावी नदी प्रदूषण परिसरात वाढले आहे. आळंदीला पाणी पुरवठा केंद्रात येणारे पाणी देखील प्रचंड प्रदूषित झाल्याने आळंदी नगरपरिषदेस अखेर भामा आसखेडच्या पाण्याची मागणी करून शुद्धीकरणावर यंत्रणेवरील ताण कमी करावा लागला.
पर्यायी सांडपाणी नलिका असताना २ फूट पाईप लाईन टाकण्यास आळंदी इंद्रायणी नदी घाटाची तोडफोड पूर्ववत करून देण्यात येणार होती. मात्र याकडे हि दुर्लक्ष झाले असून संथ गतीने सुरु असलेल्या कामावर नागरिकांतून नाराजी व्यक्त होत आहे. आळंदी देहू परिसर विकास समितीने प्रभावी लक्षवेधी घाट विकसित केले मात्र आळंदीतील नगरपरिषदेने या घाटांची तोडफोड करून विद्रुपीकरण वाढविले. ते पूर्ववत करून देण्यास प्राधान्य देण्याची गरज असल्याचे नागरिक सांगतात.
नदीत राडा रोडा - पुलाखालील सब वे वापरास बंद ने गैरसोय
आळंदी स्मशान भूमी परिसरातील नदीत मोठ्या प्रमाणात राडा रोडा, कचरा साचून राहिल्याने परिसरातील नागरिकांना यांचा त्रास होत आहे. येथे नदीत राडा रोडा साचल्याने आणि टाकला जात असल्याने नदी पात्र उधळ झाले आहे. गवताचे प्रमाण वाढले आहे. घाटाचे लगत सांडपाणी नाली टाकण्यासाठी इंद्रायणी नदी घाटाची तोडफोड करण्यात आली असून घाटाचे विद्रुपीकरण झाल्याने अनेकांनी प्रशासनाचे कामात नियोजनाचा अभाव राहिल्याचे सांगितले. यातून भाविकांनी नाराजी व्यक्त केली.

