पिंपरी चिंचवड शहराचा पाण्याचा प्रश्न सोडवणार का? प्रत्येक उमेदवार आणि राजकीय पक्षाला विचारा!

 


मी विनायक पारखी, गेली ५५ वर्ष चिंचवड येथे रहात आहे. आज एक महत्त्वाचा विषय आपणासमोर मांडणार आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची निवडणूक १५ जानेवारी २०२६ रोजी होणार आहे. मागील निवडणुकीत शास्तीकराचा मुद्दा केंद्रस्थानी होता यावेळी समस्त पिंपरी चिंचवड करांना भेडसावणारा प्रमुख मुद्दा आहे पाणी. सध्या आपल्याला एक आड दिवस पाणी पुरवठा होतो आहे तो दररोज व्हायला हवा. अनेक ठिकाणी तो सुद्धा होत नाही त्यांना tanker ने पाणी विकत घ्यावे लागते. दूसरा सर्वात महत्त्वाचा मुद्दा शुद्ध किंवा चांगल्या पाण्याचा पुरवठा.

आपण सर्वजण जाणतो की साधारण १५ वर्षांपूर्वी ना. अजित पवारांनी बंद पाइप द्वारे पाणीपुरवठा योजना आखली होती त्याचे कामही सुरू झाले होते परंतु मावळ मधील शेतकर्यांनी विरोध केल्याने व त्या आंदोलनादरम्यान गोळीबार होवून २-३ शेतकरयांना प्राण गमवावे लागल्याने ती योजना गुंडाळण्यात आली. तेव्हा सुद्धा पवना धरणातून रावेत पर्यंत वाहणारे पाणी प्रदूषित होतेच, आत्ता तर मावळ तालुक्यात मोठ्या प्रमाणात नागरीकरण आणि    औद्योगिकरण झाल्या मुळे प्रदूषणाची पातळी प्रचंड वाढली आहे.

म्हणून सर्व पिंपरी चिंचवड करांना माझे आवाहन आहे की त्यांनी मतं मागायला येणार्या प्रत्येक उमेदवाराला विचारा की ते आणि त्यांचा पक्ष ही योजना लागू करण्यासाठी काय करणार? ही योजना येत्या २ वर्षात पूर्ण करणार का?

जर भाजप व त्यांचे नेते मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आम्हाला आश्वासन देत असतील की आचारसंहिता संपल्यावर पहिल्याच मंत्रीमंडळ बैठकीत हा विषय मार्गी लावतील तर आणि तरच भाजपाला मतदान करा. तसेच ना. अजितदादा आम्हाला आश्वासन देत असतील तरच त्यांच्या उमेदवाराला मतदान करा कारण अजितदादा पूणे जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत आणि त्यांना या प्रश्नांची जाण आहे. तसेच ना. एकनाथ शिंदे साहेब हे नगरविकास खात्याचे मंत्री आहेत त्यामुळे हा विषय त्यांच्या खात्याशी संबंधित आहे आणि ते आश्वासन देत असतील तरच त्यांच्या उमेदवाराला मतदान करा नाही तर जोराचा धक्का देऊन विरोधकांना सत्तेत आणा हिच नम्र विनंती.

नुकताच इंदोर येथे दूषित पाण्यामुळे १० जणांना प्राण गमवावे लागले आहेत, जवळपास ३०० जणांना रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे आणि १५०० व्यक्ती बाधीत आहेत. इंदोर येथे एका विभागात एवढा प्रभाव पडला आहे विचार करा पिंपरी चिंचवडची लोकसंख्या ३५ लाख आहे. जरी १०% लोकसंख्या बाधीत झाली तर उपचार सुद्धा मिळणार नाहीत.

विनायक पारखी 

रस्टन काॅलनी, चिंचवड पुणे ३३

मोबाईल ९९२२८८८६८५.

थोडे नवीन जरा जुने