!-- afp header code starts here --> दिव्यांग मुलांच्या क्रिकेट स्पर्धेत अभिराज व तारा फाउंडेशनची अव्वल कामगिरी

दिव्यांग मुलांच्या क्रिकेट स्पर्धेत अभिराज व तारा फाउंडेशनची अव्वल कामगिरी

 


पिंपरी चिंचवड : दिव्यांग मुलांच्या A.W.M.H महाराष्ट्र अंतर्गत विशेष मुलांची १९ वी महाराष्ट्र राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धा मुंबई येथील प्रबोधन क्रीडा भवन, गोरेगाव येथे उत्साहात पार पडली. या स्पर्धेत राज्यभरातील एकूण १७ शाळांमधील विशेष खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता.

या स्पर्धेमध्ये अभिराज फाउंडेशन आणि तारा फाउंडेशन यांच्या संयुक्त संघाने सहभाग घेतला. या दोन्ही फाउंडेशनमधील १३ खेळाडूंच्या संयुक्त संघाने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत अव्वल कामगिरी केली आणि पुण्याचे नाव लौकिक वाढवला.


या स्पर्धेसाठी क्रीडा शिक्षक विकास जगताप आणि ऋषिकेश मुसुडगे यांनी खेळाडूंना मार्गदर्शन केले, तर योगेश आढले यांनी सहकार्य केले. या यशाबद्दल शाळेतील सर्व कर्मचारी वर्ग व संचालकांनी खेळाडूंचे अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या.

थोडे नवीन जरा जुने