टाकाऊ साहित्याचा उपयोग करून “वेस्ट टू आर्ट” संकल्पनेतून आकर्षक सौंदर्यीकरणामुळे कचरा मुक्त चौक

 


नवी सांगवी, मयूर नगरी चौक – आरोग्य विभाग व बेसिक्स टीमचा जनजागृती उपक्रम

पिंपरी चिंचवड : नवी सांगवी येथील मयूर नगरी चौकात “वेस्ट टू आर्ट” संकल्पनेतून टाकाऊ साहित्याचा सुंदर वापर करून परिसराचे आकर्षक सौंदर्यीकरण करण्यात आले. या उपक्रमामुळे GVP (Garbage Vulnerable Point) चे यशस्वी निर्मूलन झाले असून चौक आता स्वच्छ, सुंदर आणि प्रेरणादायी बनला आहे.

या जनजागृती उपक्रमात आरोग्य निरीक्षक स्नेहल सोनवणे यांनी उपस्थित राहून नागरिकांशी थेट संवाद साधला आणि स्वच्छतेबाबत मार्गदर्शन केले. त्या म्हणाल्या की, मोकळ्या जागेत, रस्त्यावर किंवा नाल्यात कचरा टाकू नये. प्रत्येकाने घरातच ओला व सुका कचरा वेगळा करून ठेवावा आणि निश्चित वेळेत येणाऱ्या कचरा संकलन गाडीतच द्यावा.

मानवी हक्क संरक्षण आणि जागृतीचे शहराध्यक्ष अण्णा जोगदंड यांनी सांगितले की, देशात पालिकेला प्रथम क्रमांक मिळवून देण्यासाठी पालिका कर्मचाऱ्यांबरोबरच नागरिकांचाही सक्रिय सहभाग आवश्यक आहे. स्वच्छता ही केवळ प्रशासनाची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाचीही आहे. चौकात कचरा न टाकणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

या उपक्रमात मुख्य आरोग्य निरीक्षक श्री. दीपक कोटियाना, आरोग्य निरीक्षक स्नेहल सोनवणे, शहराध्यक्ष अण्णा जोगदंड, महाराष्ट्र शासनाच्या गुणवंत कामगार संगीता जोगदंड, आरोग्य मुकादम अरुण जगताप, राजाराम राखपसारे, बेसिक्स वॉर्ड इंचार्ज सुनिल धावारे, पूजा जाधव (रांगोळी सजावट), पवनकुमार रंधे, अंकुश कांबळे, रोहित सुरवसे व सागर देवकर आदी मान्यवर उपस्थित राहून सहभाग नोंदवला.

या कार्यक्रमातून “स्वच्छता ही केवळ प्रशासनाची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे” हा संदेश प्रभावीपणे देण्यात आला.

थोडे नवीन जरा जुने