पिंपरी चिंचवड (सलीम सय्यद) : किवळे येथील संजय नृत्य अकादमीला अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळ यांचे अधिकृत केंद्र म्हणून मान्यता मिळाली आहे. अकादमीचे यशस्वी संचालन वैशाली धोंगडे व राजश्री धोंगडे या करत आहेत. या केंद्रात कथ्थक, भरतनाट्यम, ओडिसी व गायन या चार विषयांच्या परीक्षा घेतल्या जातात.
नुकत्याच पार पडलेल्या संगीत व नृत्य परीक्षांमध्ये या केंद्रातील अनेक विद्यार्थिनींनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे.
प्रारंभिक परीक्षा (विशेष योग्यता):
भाग्यदा वैद्य, सांची बंग, अश्विनी देशपांडे, अनिका खरे, मुद्रा कवठेकर, रमा इनामदार, वेदिका भोकरे, मायरा खडका आणि मानवी शेट्टी या विद्यार्थिनी विशेष गुणवत्तेसह उत्तीर्ण झाल्या.
प्रवेशिका प्रथम परीक्षा (उत्तम श्रेणी):
निर्विषका बोरसे, मृग्मयी देशमुख, मानसी देशमुख, पियुषा देवहाते आणि शिवानी गोसावी या विद्यार्थिनी उत्तम श्रेणीत उत्तीर्ण झाल्या.
प्रवेशिका पूर्व परीक्षा (विशेष प्राविण्य):
साक्षी भंगाळे, गौतमी कुलकर्णी, हिमानी पुराणिक, साई पाटील आणि अवनी जोशी यांनी विशेष प्राविण्य मिळवत यश संपादन केले.
तसेच, मृदुला टोणगावकर हिने विशारद प्रथम परीक्षेत चिंचवड केंद्रातून क्रियात्मक परीक्षेत प्रथम क्रमांक मिळवला.
या यशस्वी विद्यार्थिनींपैकी गौतमी कुलकर्णी या We Together संस्थेचे सचिव श्री. जयंत हरी कुलकर्णी यांच्या नात आहेत.
संजय नृत्य अकादमीच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल संस्थेचे संचालक, शिक्षकवृंद व सर्व विद्यार्थिनींचे मनःपूर्वक अभिनंदन. भविष्यातही असेच यश संपादन होवो, हीच शुभेच्छा!
