!-- afp header code starts here --> जागतिक आयटी क्षेत्रात ‘पाटील इफेक्ट’मुळे मोठी उलथापालथ

जागतिक आयटी क्षेत्रात ‘पाटील इफेक्ट’मुळे मोठी उलथापालथ

 


 आंतरराष्ट्रीय जागतिक आयटी आणि तंत्रज्ञान क्षेत्रात सध्या ‘पाटील इफेक्ट’ (Patil Effect) या संकल्पनेमुळे मोठी खळबळ उडाली असून, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आधारित नव्या तंत्रज्ञानामुळे पारंपरिक आयटी सेवा मॉडेलसमोर गंभीर आव्हान उभे राहिले आहे.

अमेरिकास्थित आघाडीची AI संशोधन संस्था Anthropic हिने विकसित केलेल्या प्रगत AI प्रणाली Claude मुळे जागतिक पातळीवर उद्योग-कार्यप्रवाहांमध्ये आमूलाग्र बदल होत आहेत. या प्रणालीमुळे कोडिंग, डेटा विश्लेषण, डॉक्युमेंटेशन, प्रोजेक्ट मॅनेजमेंट यांसारखी कामे मोठ्या प्रमाणावर स्वयंचलित होत असून, अनेक आयटी सेवा कंपन्यांच्या व्यवसाय मॉडेलवर त्याचा थेट परिणाम दिसून येत आहे.

या तांत्रिक क्रांतीचे नेतृत्व करणारे तंत्रज्ञ Rahul Patil यांच्या नावाशी हा बदल जोडला जात असून, त्यामुळेच या घडामोडींना जागतिक बाजारात ‘पाटील इफेक्ट’ असे संबोधले जात आहे.

बाजार विश्लेषकांच्या मते, AI केवळ सहाय्यक भूमिका न बजावता आता स्वतंत्रपणे संपूर्ण कार्यप्रक्रिया हाताळू शकतो, ही बाब गुंतवणूकदार आणि आयटी कंपन्यांसाठी चिंतेचा विषय ठरत आहे. यामुळे अनेक आंतरराष्ट्रीय आयटी आणि सॉफ्टवेअर सेवा कंपन्यांच्या शेअर बाजारातील मूल्यात चढ-उतार दिसून येत असून, भविष्यातील नोकऱ्या, कौशल्यांची गरज आणि कामाची रचना यामध्ये मोठे बदल अपेक्षित आहेत.

तज्ञांचे मत आहे की ‘पाटील इफेक्ट’ हा केवळ तांत्रिक बदल नसून, तो जागतिक आयटी उद्योगाच्या पुनर्रचनेचा संकेत आहे. येत्या काळात कंपन्यांना नवीन कौशल्ये, AI-सहकार्य मॉडेल आणि नव्या व्यवसाय धोरणांचा स्वीकार करावा लागणार आहे.

थोडे नवीन जरा जुने