MGID Header Code
Code End

PCMC : श्री वैश्य सुतार पुणे चॅरिटेबल ट्रस्टतर्फे विश्वकर्मा जयंती उत्साहात साजरी


पिंपरी चिंचवड (क्रांतीकुमार कडुलकर) : रावेत येथे पिंपरी-चिंचवड श्री वैश्य सुतार पुणे चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने श्री विश्वकर्मा जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. सृष्टीचे सर्जनहार प्रभू श्री विश्वकर्मा यांच्या प्रतिमेचे पूजन श्री अंकित व सौ. खुशबू वाजा, श्री सागर व सौ. तेजल सुद्रा, श्री अग्नीक व सौ. मीरा काटेलिया यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून भक्तिमय वातावरणात विधीपूर्वक करण्यात आले.

या प्रसंगी पुणे व पिंपरी-चिंचवड परिसरातील वैश्य सुतार समाजाचे बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. जयंतीचे नियोजन व संयोजन ट्रस्टचे अध्यक्ष मुकेश चुडासमा यांनी केले.

जयंतीनिमित्त विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. यामध्ये लालजी चुडासमा, प्रवीण वाढीया, सुधीर वाजा, रमेश पडियाळ, प्रतीक सुद्रा, बाबू गोढानिया, जया वाढीया, भानू चुडासमा, वैशाली गोढानिया, भूमी सुद्रा, भारती वाढीया, हर्षा वाजा आदींचा समावेश होता.

श्री विश्वकर्मा जयंतीनिमित्त भक्तिगीत, अन्नदान, रास-गरबा तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

थोडे नवीन जरा जुने