पुना क्लब ने जिंकला ग्रोव्हर कप
— ३० व्या ऐतिहासिक मालिकेत पुना क्लब ची दिमाखदार कामगिरी —
पुणे : प्रतिष्ठित ग्रोव्हर इंटर-क्लब गोल्फ स्पर्धेच्या ३० व्या ऐतिहासिक मालिकेत पुना क्लबच्या संघाने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत ग्रोव्हर कप जिंकला. या ऐतिहासिक विजयामुळे क्लबच्या क्रीडाइतिहासात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.
ग्रोव्हर चषकाचे सामने हे अतिशय अतीतटीचे झाले .उपविजेता संघ म्हणून वेलिंग्टन गोल्फ कोर्स (WSC)संघाने 25.5 होल करीत दुसरा क्रमांक पटकावला .तर युनायटेड सर्विस क्लब ने 24.5 होल करीत तिसऱ्या स्थानी राहिले तर चांगली लढत देत बाँबे प्रेसीडेंसी गोल्फ कोर्स संघ 19 होल करून चौथ्या क्रमवारीत राहीला . सुरुवातीपासूनच पुना क्लब ने होल ची आघाडी घेत नवा विक्रम करीत तब्बल 35 होल करून ग्रोवर्स चषक जिंकून इतिहास घडवला .
स्पर्धेत संघाने सातत्यपूर्ण कामगिरी, अचूक नियोजन आणि प्रभावी सांघिक समन्वयाच्या जोरावर प्रतिस्पर्ध्यांवर मात केली. या विजयात गोल्फ कप्तान जय शिर्के आणि ग्रोव्हर्स टीम कप्तान इक्रम खान यांचे नेतृत्व विशेष ठरले. टीम सपोर्ट म्हणून आदित्य कानीटकर यांनीही महत्त्वाची भूमिका बजावली.
ग्रोव्हर्स संघाचे कप्तान आणि पुना क्लबचे सल्लागार इक्रम खान यांनी सर्व विजयी खेळाडूंचे अभिनंदन केले .
विजयी संघात जय शिर्के, नीरज गुलाटी, सुशांत खोसला, नितेश शिंदे, सुमेध गांगल, वेद काकतकर, अविनाश देवस्कर, अंकित मिश्रा, सौरभ रॉय, वान्या सिंग, यश वाधवन, पी.सी. कालिया, दिवेश वाधवान, अपूर्व किशोर, आदित्य पुसाळकर, कार्तिक कृष्णराज, जिया कर्दभजने, महेश शहाणे, सुनील शिरोळे, गौरव पंडित, इंद्रजित चंदा, अवनय खन्ना, अनिरुद्ध श्रोत्रिय आणि अभिजीत गानू यांचा समावेश होता.
ग्रोव्हर स्पर्धेच्या या माइलस्टोन वर्षात मिळवलेले हे विजेतेपद पूना क्लबच्या क्रीडासंस्कृतीचा आणि खेळाडूंच्या जिद्दीचा प्रत्यय देणारे ठरले आहे. क्लबच्या पदाधिकाऱ्यांनी सर्व खेळाडूंचे अभिनंदन करत भविष्यातही अशीच उज्ज्वल कामगिरी करण्याचा विश्वास व्यक्त केला.
