श्री वैश्य सुतार पुणे चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने विश्वकर्मा जयंती उत्साहात साजरी

 


पिंपरी चिंचवड :रावेत येथे पिंपरी-चिंचवड श्री वैश्य सुतार पुणे चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने सृष्टीचे सर्जनहार प्रभू श्री विश्वकर्मा यांची जयंती भक्तिमय व उत्साही वातावरणात साजरी करण्यात आली.

यावेळी प्रभू श्री विश्वकर्मा यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन श्री अंकित व सौ. खुशबू वाजा, श्री सागर व सौ. तेजल सुद्रा, श्री अग्निक व सौ. मीरा काटेलिया यांच्या हस्ते करण्यात आले. विधीपूर्वक पूजनानंतर संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हालेला होता.

या कार्यक्रमास पुणे-पिंपरी-चिंचवड परिसरातील वैश्य सुतार समाजाचे बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. जयंतीचे नियोजन व संयोजन ट्रस्टचे अध्यक्ष श्री मुकेश चुडासमा यांनी केले.

जयंतीनिमित्त विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. त्यामध्ये लालजी चुडासमा, प्रवीण वाढीया, सुधीर वाजा, रमेश पडियाळ, प्रतीक सुद्रा, बाबू गोढानिया, जया वाढीया, भानू चुडासमा, वैशाली गोढानिया, भूमी सुद्रा, भारती वाढीया, हर्षा वाजा आदींचा समावेश होता.

श्री विश्वकर्मा जयंतीनिमित्त भक्तिगीते, अन्नदान, रास गरबा तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.


थोडे नवीन जरा जुने