!-- afp header code starts here --> डोळे ठेवा निरोगी – खा आंबा, पपई, गाजर, कोबी : पथनाट्यातून जनजागृती

डोळे ठेवा निरोगी – खा आंबा, पपई, गाजर, कोबी : पथनाट्यातून जनजागृती

 


पिंपळे गुरव : दिलासा संस्था आणि मानवी हक्क संरक्षण व जागृती या सेवाभावी संस्थांच्या वतीने रविवार, दिनांक १५ मार्च २०२६ रोजी पिंपळे गुरव येथील राजमाता जिजाऊ उद्यानाच्या प्रवेशद्वारासमोर “डोळे ठेवा निरोगी – खा आंबा, पपई, गाजर, कोबी” या विषयावर पथनाट्य सादर करून जनजागृती करण्यात आली.

या पथनाट्यात सांगवी-पिंपळे गुरव डॉक्टर असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. प्रदीप नन्नवरे, मानवी हक्क संरक्षण व जागृती संस्थेचे अध्यक्ष आण्णा जोगदंड, दिलासा संस्थेचे अध्यक्ष सुरेश कंक, तसेच सौ. संगीता जोगदंड, मुरलीधर दळवी, शामराव सरकाळे यांनी सहभाग घेतला.

यावेळी बोलताना डॉ. प्रदीप नन्नवरे म्हणाले की,“डोळे ही परमेश्वराने माणसाला दिलेली अमूल्य देणगी आहे. डोळे निरोगी ठेवण्यासाठी आहारात ‘अ’ जीवनसत्त्व असणे अत्यावश्यक आहे. ‘अ’ जीवनसत्त्वाच्या कमतरतेमुळे डोळ्यांचे विकार वाढतात. आंबा, पपई, गाजर, कोबी यामध्ये ‘अ’ जीवनसत्त्व मुबलक प्रमाणात आढळते, त्यामुळे या पदार्थांचा आहारात समावेश करावा.”

उद्यान परिसरात पथनाट्य सादर करण्यामागे उद्देश असा की, सकाळी व्यायामासाठी येणाऱ्या नागरिकांपर्यंत योग्य आहाराबाबत संदेश पोहोचावा. पथनाट्य हे जनजागृतीचे प्रभावी माध्यम असल्याचे त्यांनी नमूद केले.

आण्णा जोगदंड यांनी सांगितले की, “आजच्या धकाधकीच्या जीवनात लोकांना सुलभ व निरोगी जीवनशैलीसाठी मार्गदर्शन करण्याचे काम दिलासा संस्था आणि मानवी हक्क संरक्षण व जागृती संस्था पथनाट्य, प्रभात फेरी आदी माध्यमांतून करत आहेत.”

राष्ट्रगीताने पथनाट्याची सांगता करण्यात आली.

या कार्यक्रमास अण्णा जोगदंड, सुरेश कंक, डॉ. प्रदीप नन्नवरे, संगीता जोगदंड, मुरलीधर दळवी, शामराव सरकाळे यांच्यासह सुभाष चव्हाण, निलेश हंचाटे, पंकज पाटील, गजानन धाराशिवकर, मुख्य आरोग्य निरीक्षक शंकर घाटे, आरोग्य निरीक्षक रश्मी तुंडूलवार, राहुल ओव्हाळ, उमेश बोरसे, संजय घुमे, पवन रंधे, आशा गायकवाड, पांडुरंग सुतार, शंकर नानेकर, उदय ववले, हिरामण देवरे, बाळासाहेब साळुंके, मोहम्मद शरीफ मुलानी, राहुल जाधव, शुभम बेंद्रे, पूजा कोरी, पूजा जाधव, गणेश वाडेकर, सागर नागुलकर, सुनंदा तामचीकर, सुवर्णा कांबळे, विवेक जावीर, काशिनाथ जोशी, मोबीन पठाण, सागर पाटील, महेश सूर्यवंशी आदी उपस्थित होते.

थोडे नवीन जरा जुने