पिंपरी चिंचवड (सलीम सय्यद) : भोईर कॉलनी, कै भागुजी गोलांडे उद्यान चिंचवड रामकृष्ण मोरे सभागृह शेजारी येथील अनेक खेळणी गेल्या दोन वर्षापासून नादुरुस्त असून नगरसेवक नसल्याने सदर खेळण्याच्या दुरुस्तीकडे कुणीही लक्ष दिलेले नव्हते परंतु आत्ता नवीन नगरसेवक निवडून आलेले आहेत, ते सदर खेळणी लवकरात लवकर दुरुस्त करून घेतील अशी अपेक्षा आहे.
या उद्यानातील जवळपास सर्वच खेळणी तुटलेली आहेत सदर खेळण्याचा वापर मोठी मुले करतात असे आढळून आलेले आहे तसेच त्यांना याबाबतीत हटकल्यास सदर मुले ज्येष्ठांना दमदाटी करतात.
लवकरच परीक्षा संपून शाळांना सुट्ट्या सुरू होतील व लहान मुलांची पावले सदर उद्यानातील खेळण्याकडे धावतील त्यामुळे ही खेळणी लवकर दुरुस्त होणे आवश्यक आहे.
हीच परिस्थिती बहुतेक सगळ्या उद्यानातील खेळण्याची आहे
तसेच सदर उद्यानात लावलेल्या शोभेच्या खांबावरचे दिवे गायब झालेले आहेत व अनेक ठिकाणची वाकडी काढून मद्यपी लोकांनी रात्री बसून पार्टी करण्यासाठी जागा बनवलेल्या आहेत त्यांच्यावर कोणाचाही वचक नाही.
