जुन्नरमध्ये यंग मुस्लिम ग्रुपतर्फे रोजा इफ्तार पार्टी उत्साहात


जुन्नर (प्रतिनिधी - रफिक शेख) : जुन्नर शहरातील सदाबाजार पेठ येथे यंग मुस्लिम ग्रुपच्या वतीने रोजा इफ्तार पार्टीचे आयोजन उत्साहात करण्यात आले. दरवर्षीप्रमाणे यंदाही या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने मुस्लिम बांधव उपस्थित राहून सामूहिकरीत्या रोजा सोडला.

या प्रसंगी विशेष दुवा पठण करण्यात आले. देश, राज्य आणि जुन्नर शहराच्या प्रगतीसाठी तसेच सर्वांच्या सुख-समृद्धीसाठी प्रार्थना करण्यात आली. शकील भाई हाश्मी आणि रिजवान मौलाना यांनी दुवा पठण केले.


कार्यक्रमादरम्यान जुन्नर पोलीस स्टेशनचे पी.आय. अवचर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी वाहतूक व्यवस्थेचे सुयोग्य नियोजन केले. तसेच कार्यक्रमासाठी स्थानिक प्रशासन आणि पोलिसांचे सहकार्य लाभले.

यावेळी जुन्नर नगरपालिकेचे नगरसेवक वाजीद भाई इनामदार, रिजवान पटेल, जमीर भाई कागदी, राजू भाई रुफ इनामदार तसेच अनेक सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते. सामाजिक ऐक्य, बंधुभाव आणि एकात्मतेचा संदेश देणारा हा इफ्तार कार्यक्रम शहरात उत्साहात आणि शांततेत पार पडला.

थोडे नवीन जरा जुने