पिंपरी चिंचवड (क्रांतीकुमार कडुलकर) : क्वालिटी सर्कल फोरम ऑफ इंडिया पुणे चॅप्टरच्या वतीने भोसरी येथील 'क्वालिटी सर्कल एक्सलन्स सेंटर'मध्ये आयोजित करण्यात आलेली 'सुरक्षा सप्ताह २०२६ स्पर्धा' मोठ्या उत्साहात आणि यशस्वीरित्या पार पडली. औद्योगिक क्षेत्रातील कामाच्या ठिकाणची सुरक्षितता आणि उत्कृष्टतेबद्दलची बांधिलकी अधोरेखित करणाऱ्या या कार्यक्रमाला ५५ नामांकित संस्थांमधील तब्बल ५४६ स्पर्धकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
या स्पर्धेअंतर्गत विविध श्रेणींमध्ये एकूण २६१ नामांकने प्राप्त झाली. यामध्ये ८६ 'केस स्टडीज', २४ पथनाट्ये, ९३ पोस्टर्स आणि ५८ घोषवाक्यांचा समावेश होता. या सादरीकरणांमधून सुरक्षा जागरूकता आणि समस्या सोडवण्याच्या विविध नाविन्यपूर्ण दृष्टिकोनांचे उत्कृष्ट दर्शन घडले.
कार्यक्रमाचे उद्घाटन प्रमुख पाहुणे आयनबॉन्ड कोटिंग्ज इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक विजयकांत मोरे, कॉलिटी सर्कल फोरम ऑफ इंडिया च्या संचालिका डॉ. रजनी इंदुलकर आणि पुणे चॅप्टर कौन्सिलचे सदस्य संजीव शिंदे यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आले.
कार्यक्रमाच्या समारोप सत्रासाठी टाटा ऑटोकॉम्प लिमिटेडचे (कंपोझिट आणि कॅटकॉन एक्झॉस्ट
सिस्टीम्स) बिझनेस युनिट हेड नितीन नाईक हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. नितीन नाईक, डॉ. रजनी इंदुलकर, कौन्सिल सदस्य भूपेश मल्ल, परवीन तरफदार आणि मान्यवर परीक्षकांच्या हस्ते विजेत्या स्पर्धकांना आणि संस्थांना सुवर्ण, रजत, कास्य पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले.
या स्पर्धेत टाटा मोटर्स- ईआरसी, टाटा ऑटोकॉम्प ग्रुप कंपनीज, फोर्ब्स मार्शल, आयएसी इंटरनॅशनल, सिग्मा इलेक्ट्रिक मॅन्युफॅक्चरिंग, किर्लोस्कर ऑइल इंजिन्स, माहले आनंद, आरएसबी ट्रान्समिशन, मिंडा ग्रुप, एसकेएफ इंडिया, सुल्झर इंडिया लिमिटेड, डेलव्हल, केमेटल बीएएसएफ, झेडएफ इंडिया, अल्ट्राकॉर्प, दाना आनंद, शारदा इंडस्ट्रीज, श्नेलेक जिना लॉजिस्टिक्स, लिगसी लाइफ स्पेसेस, आर्सेलरमित्तल नील टेलर्ड ब्लँक्स, पॉलिरब कूपर स्टँडर्ड, ओरिएंटल यीस्ट इंडिया, कॉर्निंग टेक्नॉलॉजीज आणि कमिन्स ग्रुप कंपनीज यांसारख्या प्रमुख औद्योगिक संस्थांनी सक्रिय सहभाग नोंदवला. हा सहभाग उद्योगांची सुरक्षा संस्कृतीप्रती असलेली वचनबद्धता सिद्ध करतो.
स्पर्धेचे अत्यंत बारकाईने व पारदर्शक परीक्षण तज्ज्ञांच्या एका विशेष समितीने केले. या समितीमध्ये राहुल पाटील, अनंत चिंचोलकर, महादेव लोहार, धीरेंद्र थिटे, पंकज बडगुजर, हनुमंत तिकाटे, रितू मेहता, मिलिंद जाधव, प्रत्युष पी., प्रशांत आळेकर, विनायक साळुंखे, परवीन तरफदार, विठ्ठल वाघचौरे आणि मनीष गावडे या मान्यवरांचा समावेश होता.
कार्यक्रमाचे खुमासदार सूत्रसंचालन विजया रुमाले यांनी केले. या महास्पर्धेचे नेटके नियोजन रहिम मिर्झाबेग, प्रशांत बोराटे आणि चंद्रशेखर रुमाले यांच्या आयोजन समितीने केले, ज्यामुळे हा कार्यक्रम निर्दोष आणि सुरळीतपणे पार पडला.
कॉलिटी सर्कल फोरम ऑफ इंडिया पुणे चॅप्टर उद्योग जगतात उत्कृष्टतेची संस्कृती रुजवत, गुणवत्ता आणि सुरक्षिततेच्या उपक्रमांचे नेतृत्व करण्यास कटिबद्ध असल्याचे या यशस्वी आयोजनातून पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.
