पिंपरी चिंचवड (सलीम सय्यद) : चिंचवडगाव येथील काशीधाम मंगल कार्यालय येथे वुई टुगेदर संस्थेतर्फे जागतिक महिला दिनानिमित्त उपस्थित सर्व महिलांचा सन्मान, प्रबोधन तसेच नेत्र आरोग्याची माहिती असा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. सदर कार्यक्रमाला समाज प्रबोधनकार शारदाताई मुंडे या प्रमुख वक्त्या होत्या तसेच ईशा नेत्रालय चिंचवड स्टेशन या नेत्र रुग्णालयाच्या तसेच सेंटर हेड ध्रुवशी पाटील, वरिष्ठ नेत्र सर्जन रश्मी लोंढे तसेच पुणे जिल्ह्याच्या क्रीडा अधिकारी मनीषा माळी या स पाहुणे म्हणून उपस्थित होत्या.
सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहसचिव मंगला डोळे सपकाळे यांनी केले व पाहुण्यांची ओळख संस्थेच्या महिला समन्वयक अपर्णाताई कुलकर्णी यांनी अतिशय सुंदरपणे करून दिली .
कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे सचिव जयंत कुलकर्णी यांनी केले त्यांनी आपल्या भाषणात संस्थेने आतापर्यंत केलेल्या कामाचा आढावा घेतला तसेच येणाऱ्या दिवसात संस्थेचे कार्यक्रम व त्याविषयी संस्था करत असलेली माहिती याची माहिती दिली तसेच येत्या जून महिन्यात संस्थेतर्फे शैक्षणिक सहायता निधी तर्फे गरजू मुलांना शैक्षणिक सहायता निधी चे वाटप केले जाईल असे सांगितले तसेच गेल्या वर्षी सुद्धा सर्व सभासदांच्या व देणगीदारांच्या मदतीने सदर कार्यक्रम अतिशय चांगल्या प्रकारे केलेला होता व 11 गरीब विद्यार्थ्यांना 55 हजार त्यांची मदत देण्यात आली होती हेही आवर्जून नमूद केले तसेच सर्व सभासदांनी या कामाला सढळ हस्ते मदत करावी अशी विनंती माननीय सचिव यांनी केली.
कार्यक्रमाची सुरुवात जे सभासद अनंतात विलीन झाले त्यांना श्रद्धांजली अर्पण करून झाली. नंतर राष्ट्रगीत होऊन प्रमुख पाहुणे तसेच संस्थेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व सल्लागार यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले.
संस्थेचे अध्यक्ष माननीय मधुकर बच्चे यांनी ईशा नेत्रालयाचे कौतुक केले तसेच त्यांनी आतापर्यंत बरीच मदत गरीब रुग्णांना केलेली आहे याचाही आवर्जून उल्लेख केला. तसेच इशा नेत्रालयाच्या सहकार्याने आपण आतापर्यंत बरेच डोळ्यांचे कॅम्प आयोजित केलेले होते याचाही उल्लेख त्यांनी केला .आपल्या सभासदांच्या ओळखीच्या नातेवाईकांना किंवा गरजूंना काहीही मदत लागल्यास त्यांनी संस्थेला संपर्क साधावा व संस्था आपल्या परीने सदर सभासदाला मदत करण्याचा प्रयत्न करेल असे सांगितले .
तसेच संस्थेची सभासद सोनाली शिंदे हिच्या पुनर्विवाह निमित्त तिचा यावेळी सत्कार करण्यात आला.
------------------------
आज आपण सर्वजण स्त्रीशक्तीचा सन्मान करण्यासाठी एकत्र आलो आहोत. स्त्री म्हणजे केवळ एक व्यक्ती नाही, तर ती सृष्टीची निर्माती, कुटुंबाचा आधारस्तंभ आणि समाजाची ताकद आहे. स्त्री म्हणजे आभाळमाया असते, अखंड विश्वाची संस्कृती स्त्रियांनी निर्माण केली आहे.
शारदा ताई मुंडे
-----------------------------
स्त्रीचा सन्मान फक्त ८ मार्चला (महिला दिनी) न करता, तो वर्षभर व्हायला हवा, 'परस्त्री मातेसमान' ही आपली संस्कृती आहे, ती खऱ्या अर्थाने रुजली पाहिजे
समानतेची मानसिकता: स्त्री आणपुरुष हे एकमेकांना पूरक आहेत. आजच्या युगात स्त्रिया पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहेत, त्यामुळे कामाच्या ठिकाणी आणि घरातही त्यांना समान अधिकार व सन्मान मिळणे गरजेचे आहे.
स्मिता उर्फ ऊर्जिता जाधव
--------------------------------------
आजच्या या दिवशी आपण प्रतिज्ञा करूया की, आपण स्त्रीचा सन्मान करू, तिच्या प्रगतीला पाठिंबा देऊ आणि एका सुरक्षित व समानतेच्या समाजाच्या निर्मितीसाठी प्रयत्न करू.'जिथे स्त्रीचा सन्मान होतो, तिथेच खऱ्या अर्थाने समाजाचा विकास होतो!'
मधुकर बच्चे
-------------------------------
सदर कार्यक्रमाला उपस्थित सर्व महिला भगिनींचा सत्कार यावेळी संस्थेच्या प्रमुख वक्त्या शारदाताई मुंडे व प्रमुख पाहुणे ध्रुवशी पाटील, मनीषा माळी, डॉ रश्मी लोंढे, मधुकर बच्चे, रवींद्र सागडे, रवींद्र काळे, खुशाल दुसाने, जयंत कुलकर्णी, दिलीप चक्रे, मंगला डोळे सपकाळे व अपर्णा कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आला.
याप्रसंगी सर्व महिला भगिनींना ईशान नेत्रालयातर्फे अतिशय सुंदर असे गिफ्ट देण्यात आले हो त्याचा उपयोग कसा करायचा याविषयी माहिती ईशान नेत्रालयाच्या सेंटर हेड ध्रुवशी पाटील यांनी आवर्जून सांगितले
संस्थेच्या सभासद स्मिता उर्फ ऊर्जिता जाधव, प्रतिभा शिंदे यांनी आपले मनोगत व्यक्त केले व संस्थेच्या कार्याचा गौरव केला
तसेच संस्थेतील सभासदांनी त्यांना त्यांच्या कठीण काळात बहुमूल्य अशी मदत केलेली आहे याचा आवर्जून उल्लेख केला
गिरी सिस्टर्स या नावाने परिचित असणाऱ्या व रुग्णांना ॲम्बुलन्स सेवा पुरविणाऱ्या दोन्ही भगिनींचा ही सत्कार संस्थेचे उपाध्यक्ष व लायन्स क्लब चिंचवडचे अध्यक्ष रवींद्र काळे तसेच संस्थेचे सल्लागार रवींद्र सागडे व संस्थेचे दुसरे सल्लागार खुशाल दुसाने यांच्या हस्ते करण्यात आला
शिवछत्रपती पुरस्कार विजेती दिव्यांग खेळाडू वैष्णवी जगताप हिचा सुद्धा सत्कार ईशा नेत्रालयाच्या सेंटर हेड ध्रुवशी पाटील व मनीषा माळी यांच्या हस्ते करण्यात आला .
प्रमुख वक्त्या शारदाताई मुंडे यांनी त्यांच्या खुमासदार शैलीत सर्व महिला भगिनींचे प्रबोधन केले तसेच प्रमुख पाहुण्या ईशा नेत्रालयाच्या सेंटर हेड ध्रुवशी पाटील यांनी ईशा नेत्रालयातर्फे केल्या जाणाऱ्या कामाची सविस्तर माहिती दिली तसेच संस्थेतील कोणालाही काहीही मदत लागल्यास त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा असे त्यांनी आवर्जून सांगितले.
ईशा नेत्रालयाच्या ज्येष्ठ नेत्ररोग तज्ञ डॉ रश्मी लोंढे यांनी पन्नाशीनंतर डोळ्याचे आरोग्य कसे जपावे याविषयी सविस्तर माहिती दिली तसेच दुसऱ्या पाहुण्या मनीषा माळी यांनी खेळाविषयी माहिती दिली तसेच त्यांनी स्वतः भारताचे प्रतिनिधित्व ऑलिंपिक मध्ये केलेले आहे असे सांगितले व त्या संदर्भात काही मदत लागल्यास आवर्जून या असेही सांगितले. या कार्यक्रमास 50 महिला उपस्थित होत्या.
कार्यक्रमाची सांगता वंदे मातरम गीताने झाली नंतर संस्थेचे खजिनदार दिलीप चक्रे यांनी आभार प्रदर्शन केले.
अल्पपोहार व चहापानानंतर कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.





