NMMC Recruitment 2025 :
नवी मुंबई महानगरपालिका (Navi Mumbai Municipal Corporation – NMMC) अंतर्गत सन 2026 साठी विविध संवर्गांतील रिक्त पदे भरण्यासाठी भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली असून, पदांनुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
या भरतीअंतर्गत वैद्यकीय तज्ञ/अधिकारी, सहाय्यक आयुक्त, महापालिका उपसचिव, सहाय्यक विधि अधिकारी, कनिष्ठ अभियंता (विद्युत) आणि कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी) अशा विविध महत्त्वाच्या पदांचा समावेश असून, एकूण 132 पदे भरली जाणार आहेत. प्रशासन, आरोग्य, कायदा व अभियांत्रिकी क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी ही एक मोठी संधी मानली जात आहे.
या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता पदानुसार वेगवेगळी असून, वैद्यकीय पदांसाठी MD/MBBS किंवा पशुवैद्यकीय शास्त्रातील पदव्युत्तर पदवी, प्रशासकीय पदांसाठी कोणत्याही शाखेतील पदवी, तर कनिष्ठ अभियंता पदांसाठी विद्युत किंवा यांत्रिकी अभियांत्रिकी पदवी तसेच विधि अधिकारी पदासाठी विधी शाखेतील पदवी आवश्यक आहे. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून पात्रतेची खात्री करून घेणे आवश्यक आहे. अर्ज प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन असून, आवश्यक कागदपत्रांसह अर्ज सादर करणे बंधनकारक आहे.
या भरतीसाठी उमेदवारांचे वय 18 ते 38 वर्षांदरम्यान असावे, अशी अट असून मागासवर्गीय, अनाथ उमेदवारांना 5 वर्षांची वयोमर्यादेत सूट देण्यात आली आहे. निवड झालेल्या उमेदवारांची नियुक्ती नवी मुंबई येथे करण्यात येणार असून, वेतनमान महानगरपालिकेच्या नियमानुसार दिले जाणार आहे. अर्ज शुल्क सर्वसाधारण प्रवर्गासाठी ₹1000 इतके असून, मागासवर्गीय, अनाथ, दिव्यांग व आदुघ प्रवर्गातील उमेदवारांसाठी ₹900 इतके शुल्क निश्चित करण्यात आले आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांनी 04 फेब्रुवारी 2026 पर्यंत ऑनलाईन अर्ज करून या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन नवी मुंबई महानगरपालिकेकडून करण्यात आले आहे.
-----------------------------------------------------------------
अधिक माहितीसाठी - येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट - येथे क्लिक करा
जाहिरात पाहण्यासाठी - येथे क्लिक करा
अर्ज करण्यासाठी - येथे क्लिक करा
-----------------------------------------------------------------
मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 7719223351 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअर’
● महत्वाच्या सूचना :
1. या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
2. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
3. उमेदवारांनी खालील दिलेल्या पत्त्यावर अर्ज सादर करावे.
4. अर्ज करण्याची शेवटची तारीख : 04 फेब्रुवारी 2026
5. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
6. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
