BOI Bharti : बँक ऑफ इंडिया अंतर्गत 400 पदांसाठी भरती

BOI Bharti: Recruitment for 400 posts under Bank of India


BOI Recruitment 2025 : 

बँक ऑफ इंडिया (Bank of India) अंतर्गत सन 2026 साठी अप्रेंटिस पदांची मोठी भरती जाहीर करण्यात आली असून, एकूण 400 रिक्त पदे भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. बँकिंग क्षेत्रात करिअरची सुरुवात करू इच्छिणाऱ्या तरुण-तरुणींसाठी ही एक महत्त्वाची आणि संधीची भरती मानली जात आहे.

या भरतीसाठी उमेदवार कोणत्याही शाखेतील पदवीधर असणे आवश्यक असून, शैक्षणिक पात्रता व इतर अटींबाबतची सविस्तर माहिती उमेदवारांनी बँक ऑफ इंडियाने प्रसिद्ध केलेल्या मूळ जाहिरातीत तपासणे गरजेचे आहे. अर्ज प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन असून, आवश्यक कागदपत्रांसह निर्धारित कालावधीत अर्ज सादर करणे बंधनकारक आहे. निवड झालेल्या उमेदवारांना प्रशिक्षण कालावधीत दरमहा ₹13,000 इतके मानधन देण्यात येणार आहे.

या भरतीसाठी उमेदवारांचे वय 20 ते 28 वर्षांदरम्यान असावे, अशी अट असून, अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (SC/ST) उमेदवारांना 5 वर्षांची, तर इतर मागासवर्गीय (OBC) उमेदवारांना 3 वर्षांची वयोमर्यादेत सूट देण्यात आली आहे. निवड झालेल्या उमेदवारांची नियुक्ती संपूर्ण भारतातील विविध शाखांमध्ये करण्यात येणार आहे. अर्ज शुल्क जनरल, OBC व EWS उमेदवारांसाठी ₹800 इतके असून, SC/ST व महिला उमेदवारांसाठी ₹600 तर दिव्यांग (PWD) उमेदवारांसाठी ₹400 इतके शुल्क निश्चित करण्यात आले आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांनी 10 जानेवारी 2026 पर्यंत ऑनलाईन अर्ज करून या संधीचा लाभ घ्यावा.

-----------------------------------------------------

अधिक माहितीसाठी - येथे क्लिक करा

अधिकृत वेबसाईट - येथे क्लिक करा

जाहिरात पाहण्यासाठी - येथे क्लिक करा

अर्ज करण्यासाठी - येथे क्लिक करा

-----------------------------------------------------

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 7719223351 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअर’

● महत्वाच्या सूचना :

1. या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.

2. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.

3. उमेदवारांनी खालील दिलेल्या पत्त्यावर अर्ज सादर करावे.

4. अर्ज करण्याची शेवटची तारीख : 10 जानेवारी 2026

5. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.

6. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

थोडे नवीन जरा जुने