पिंपरी चिंचवड महापालिकेच्या कर संकलन विभागाचा पुन्हा उच्चांक!

 


आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये ९६१ कोटींची विक्रमी वसुली

६ लाख ३१ हजार ६१५ मालमत्ताधारकांनी भरला कर

पिंपरी चिंचवड (क्रांतीकुमार कडुलकर) : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या कर संकलन व कर आकारणी विभागाने आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये तब्बल ९६१ कोटी रुपयांचा मालमत्ता कर वसूल करत सलग दुसऱ्यांदा साडेनऊशे कोटींचा टप्पा पार केला आहे. शहरातील एकूण ७ लाख ३२ हजार मालमत्तांपैकी ६ लाख ३१ हजार ६१५ मालमत्ताधारकांनी कराचा भरणा केला आहे.

महापौर रवि लांडगे व आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी कर भरणाऱ्या नागरिकांचे मनःपूर्वक आभार मानले आहेत.

नागरिकांचा वाढता प्रतिसाद

दरवर्षी कर भरणाऱ्यांची संख्या वाढत असून नागरिकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. गतवर्षी ९६६ कोटींची वसुली झाली होती. यंदा निवडणूक प्रक्रियेमुळे तीन महिने कर्मचारी व्यस्त असूनही महापालिकेने उल्लेखनीय कामगिरी केली आहे.

विविध उपक्रमांमुळे वाढलेली वसुली

थकबाकी वसुलीसाठी पुढील उपाययोजना राबविण्यात आल्या 

मालमत्ता जप्तीची कारवाई

नळ कनेक्शन खंडित करणे

थकबाकीदारांची नावे जाहीर करणे

होर्डिंग, फ्लेक्स व सोशल मीडियाद्वारे जनजागृती

लाऊडस्पीकरद्वारे घोषणा

घरभेटी व नोटिसा

यामुळे कर वसुलीत लक्षणीय वाढ झाली.

अभय योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद

दि. १ मार्च ते ३१ मार्च २०२६ दरम्यान राबविण्यात आलेल्या अभय योजनेत –

७०,२३८ थकबाकीदारांनी सहभाग

२०२ कोटी १७ लाख वसुली

५५ कोटी ४७ लाख सवलत

या योजनेमुळे नागरिकांना आर्थिक दिलासा मिळाला.

झोननिहाय वसुलीत वाकड अव्वल

महापालिकेच्या १८ झोनपैकी वाकड विभागाने ११७.७८ कोटींची सर्वाधिक वसुली केली. त्यापाठोपाठ थेरगाव, चिखली, किवळे, भोसरी, मोशी आदी झोनचा क्रमांक लागतो.

मालमत्ता कर वसुलीचे माध्यम

ऑनलाइन – ६९७.१९ कोटी

रोख – १०४.८७ कोटी

धनादेश – ११९.१३ कोटी

डीडी – ७.०९ कोटी

ईडीसी – ६ लाख

मालमत्तांची प्रकारनिहाय आकडेवारी

निवासी – ५,५५,२७०

बिगरनिवासी – ५२,६४५

औद्योगिक – ४,८१६

मिश्र – १३,७७६

मोकळी जमीन – ५,०७७

इतर – ३१

एकूण – ६,२७,७९०

मागील आठ वर्षांतील कर वसुली (कोटींमध्ये)

२०१८-१९ : ४७१

२०१९-२० : ४८०

२०२०-२१ : ५५३

२०२१-२२ : ६२८

२०२२-२३ : ८१६

२०२३-२४ : ९७७

२०२४-२५ : ९६६

२०२५-२६ : ९६१

मान्यवरांचे अभिप्राय

रवि लांडगे, महापौर :

“नागरिकांनी दिलेला सकारात्मक प्रतिसाद हा अभिमानास्पद आहे. कर भरणे म्हणजे शहराच्या विकासात थेट सहभाग आहे.”

डॉ. विजय सूर्यवंशी, आयुक्त :

“सुलभ व पारदर्शक सुविधा उपलब्ध केल्यामुळे कर वसुलीत वाढ झाली. सर्व करदात्यांचे मनःपूर्वक आभार.”

तृप्ती सांडभोर, अतिरिक्त आयुक्त :

“सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे साडेनऊशे कोटींचा टप्पा पार करता आला. पुढील वर्षातही अधिक महसूलाचे लक्ष्य आहे.”

सचिन पवार, उपआयुक्त :

“अल्पावधीत नियोजन करून दोन महिन्यांत मोठी वसुली साध्य झाली. एकत्रित प्रयत्नांचे हे यश आहे.”

थोडे नवीन जरा जुने